Views


*केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी सुधारणा विधेयक पारीत केला, या विधेयकाला महाराष्ट्र सरकारने स्थगिती आदेश दिल्याने भाजपा लोहारा तालुका यांच्या वतीने या स्थगिती आदेशाची होळी करुन तहसीलदारांना निवेदन* 


उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी सुधारणा विधेयक पारीत केला, या विधेयकाला महाराष्ट्र सरकारने स्थगिती आदेश दिल्याने भाजपा लोहारा तालुका यांच्या वतीने या स्थगिती आदेशाची होळी करुन तहसीलदार यांना दि.7 ऑक्टोबर 2020 रोजी निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, मा.पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी सुधारणा विधेयक 2020 मध्ये देशभरात लागू केले आहे. या विधेयकामुळे शेतकऱ्यांना चांगले दिवस येणार आहेत. शेतकऱ्याला आपला माल कोठेही विकण्याची मुभा या विधेयकात केलेली आहे. त्याच बरोबर केंद्र सरकारने हमीभाव खरेदी पूर्वीप्रमाणे चालू ठेवली आहे. या विधेयकामुळे शेतकरी यांना दलालांचा जो त्रास पूर्वी व्हायचा तो आता होणार नाही. असे अनेक चांगले निर्णय या विधेयकाद्वारे केंद्र सरकारने घेतले आहे. परंतु महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने या विधेयकाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यावर मोठा अन्याय होणार आहे. म्हणून महाराष्ट्र सरकारने ही स्थगिती तात्काळ उठवुन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनात केली आहे. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राहुलदादा पाटील, जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेटटी, भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, तालुका सरचिटणीस नेताजी शिंदे, महिला मोर्चा तालुकाध्यक्षा तथा नगरसेवीका सौ‌.आरती सतिश गिरी, नगरसेवक आयुब अब्दुल शेख, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष बालाजी चव्हाण, भाजपा मीडिया तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, माजी तालुकाध्यक्ष प्रमोद पोतदार, जिल्हा कार्यकारणी सदस्य कमलाकर सिरसाठ, गणेश जवादे, विकी मोरे, अंकुश बंडगर, बाबुराव घाडगे, आदी उपस्थित होते.

 
Top