*केंद्र सरकारच्या कृषी विधेयकास राज्य शासनाने दिलेल्या स्थगिती आदेशाची भाजपाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर होळी*
उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)
शेतकऱ्यांच्या स्वातंञ्यावर घाला घालणाऱ्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारने केंद्र सरकार कायद्याच्या अंमलबजावणीस स्थगिती दिली त्या आदेशाची दि.7 ऑक्टोबर 2020 रोजी भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली परंडा तहसिल कार्यालयासमोर स्थगिती आदेशाची प्रत जाळून निषेध करण्यात आला. पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने राष्ट्रहीत व जनहिताचे केवळ अनेक ऐतिहासिक निर्णयच घेतले नाहीत तर यशस्वी अंमलबजावणी करण्याचे कामही केले. यामुळेच देशात अभिमानाने म्हटले जाते की, "मोदी है,तो मुमकिन है". आता मोदी सरकारने संसदेच्या दोन्ही सभागृहात ऐतिहासिक कृषीविषयक विधेयक मंजूर करुन शेतकऱ्यांच्या जीवनात आमुलाग्र क्रांती घडविणारे पाऊल उचलले आहे. माञ शेतकऱ्यांबद्दल बेगडी प्रेम असणारी काँग्रेस आणि विरोधक अकारण कांगावा व अपप्रचार करुन राजकारण करीत आहेत. या नविन कायद्यामुळे देशातील शेतकरी बंधमुक्त आणि दलालांच्या जोखडातून मुक्त होऊन त्याला आपल्या कष्टाने पिकवलेल्या शेतीमालाच्या विक्री व बाजारपेठेचे स्वातंत्र्य मिळणार आहे. शेतकऱ्यांसाठी एक देश,एक बाजारपेठ असणार आहे. आपला शेतीमाल कुठेही आणि योग्य भावात विकण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे. पंतप्रधान मा.मोदीजींनी एमएसपी कुठल्याही परस्थितीत बंद होणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. या कृषी सुधारणा विधेयकामुळे शेतकऱ्यांना ख-या अर्थाने स्वातंञ्य प्राप्त होणार आहे. नेहमीच शेतकऱ्यांबद्दल पुतना मावशीचे प्रेम दाखवून शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या आणि मा.देवेंद्रजी फडणवीस सरकारने कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीत शेतकऱ्यांना दिलेल्या मतांचा अधिकार काढून घेणाऱ्या महाराष्ट्रातील बेगडी नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मोदी सरकारने दिलेले शेतकऱ्यांचे स्वातंञ्य हिरावणारा स्थगिती आदेश काढला आहे. याप्रसंगी अल्पसंख्याक चिटणीस ॲड. जहीर चौधरी, माजी सैनिक आघाडी जिल्हाध्यक्ष महाविर तनपुरे, जिल्हा उपाध्यक्ष सुखदेव टोंपे, चिटणीस ॲड. गणेश खरसडे, तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील, सरचिटणीस विठ्ठल तिपाले, रमेश पवार, तानाजी पाटील, अरविंद रगडे, सारंग घोगरे, तुकाराम हजारे, बाळु गिरी, सुभाष लटके, धनंजय गायकवाड, दादासाहेब गुडे, साहेबराव पाडुळे, किरण देशमुख, बापु कोळी, जयवंत पाटील, रमेश काळे, स्वानंद पवार, बाळासाहेब गोडगे, सागर पाटील, ब्रम्हदेव उपासे, प्रकाश फरतडे, जयंत सायकर, समाधान शिंदे, धनेश काळे, सुखदेव इंगळे, धनंजय काळे, कल्याण घळके, पोपट सुरवशे, दत्तात्रय ठाकरे तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.