Views


*लॉक डाऊन काळातील ऑनलाईन अभ्यासासाठी BSNL ने प्रत्येक गावात वाय-फाय सुविधा कार्यान्वित करणे बाबत मनसेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी....*

उस्मानाबाद:-(सैफोद्दीन काझी)

      महाभयंकर कोरोना आजाराचा प्रादुर्भाव टाळता यावा या साठी सर्वच शाळा, महाविद्यालये बंद आहेत,शिक्षक ऑनलाईन पध्दतीने विध्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत,ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या ऑनलाईन अभ्यासाचा लाभ घेण्यासाठी मोबाईल रीचार्ज साठी जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत. BSNL च्या सेवा ग्रामीण भारताच्या सर्वच भागात खूप अगोदर पासूनच पोहोचलेल्या असल्याने याच जोडण्यांमार्फत आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक गावांमध्ये BSNL च्या वाय-फाय सुविधांचा लाभ मिळावा म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या मार्फत जिल्ह्यातील सर्वच BSNL च्या कार्यालयांना आदेश काढावेत जेणेकरून ग्रामीण भागातील गोरगरीब परंतु शिक्षणाची आवड असलेल्या शेतकरी,शेत मजूर, कामगार यांच्या मुलांना अत्यल्प दरात ऑनलाईन पध्दतीने शिक्षण घेता येईल हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रामाणिक प्रयत्न असल्याचे जिल्हा उप-अध्यक्ष शाबीर भाई शेख यांनी यावेळी सांगितले,
   ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांच्या फायद्याच्या असलेल्या मनसेच्या या मागणीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देऊन तात्काळ जिल्ह्यातील सर्वच BSNL च्या कार्यालयांना प्रत्येक गावातील वाय-फाय सुविधा कार्यान्वित करण्याचे आदेश द्यावेत अश्या आशयाचे निवेदन देण्यात आले.
    यावेळी उस्मानाबाद मनसेचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र गपाट, उप-जिल्हा अध्यक्ष शाबीर शेख,शेतकरी सेनेचे विश्वनाथ पाटील,प्रवीण पाटील तसेच मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top