Views


भारतीय जनता पार्टी उस्मानाबाद जिल्हा नवीन  कार्यकारणी जाहीर -- भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे


उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

भारतीय जनता पार्टी उस्मानाबाद जिल्हा कार्यकारणी, मोर्चा अध्यक्ष आघाड्यांचे संयोजक यांच्या नियुक्त्या भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर, आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी जाहीर केल्या आहेत. या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे ॲड.मिलिंद पाटील, दत्ताभाऊ कुलकर्णी, ॲड.खंडेराव चौरे, ॲड.व्यंकट गुंड, ॲड.अनिल काळे, सुधीर पाटील, सतीश दंडनाईक, नेताजी पाटील, अदिंनी स्वागत करून शुभेच्छा दिले आहे. या नवनियुक्त जिल्हा कार्यकारणीत उपाध्यक्ष 10, जिल्हा सरचिटणीस 4, जिल्हा चिटणीस 10, विशेष निमंत्रित 20, कार्यकारिणी सदस्य 68, यांच्यासह इतर पदाधिकार्‍यांचा समावेश केला आहे. जिल्ह्यातील तालुक्यातील सक्रीय पदाधिकारी व सदस्यांना यामध्ये संधी देण्यात आली आहे. यामध्ये भाजप जिल्हा उपाध्यक्ष -- ॲड. अभय चालूक्य उमरगा, विक्रम देशमुख तुळजापूर, सुखदेव टोंपे परंडा, ॲड.दिपक आलुरे तुळजापूर, प्रा. दिलीप पाटील कळंब, इंद्रजित देवकते उस्मानाबाद, महादेव आखाडे वाशी, सुरेश कवडे वाशी, दत्ता सोनटक्के उस्मानाबाद, राहुल पाटील सास्तुरकर लोहारा, जिल्हा सरचिटणीस -- माधव पवार उमरगा, आदम शेख भूम, प्रदीप शिंदे उस्मानाबाद, ॲड.नितीन भोसले उस्मानाबाद, जिल्हा चिटणीस -- सुहास साळुंखे तुळजापूर, ॲड. गणेश खरसाडे परंडा, गुलचंद व्यवहारे तुळजापूर, सखुबाई पवार परंडा, विक्रांत संगशेट्टी लोहारा, सुनील काकडे उस्मानाबाद, वसंत वडगावे तुळजापूर, आशाताई लांडगे उस्मानाबाद, सौ.चांदणे हेमा केशेगाव, ज्योत्सना लोमटे उस्मानाबाद, कोषाध्यक्ष -- गणेश नाईक तुळजापूर, प्रसिद्धीप्रमुख -- साहेबराव घुगे तुळजापूर, सह प्रसिद्धीप्रमुख -- विनायक कुलकर्णी उस्मानाबाद, युवा मोर्चा -- राजसिंहा राजेनिंबाळकर उस्मानाबाद, महिला मोर्चा -- माधुरी गरड उस्मानाबाद, किसान मोर्चा --  संजय पाटील कळंब, ओबीसी मोर्चा -- विजय शिंगाडे तुळजापूर, एस सी मोर्चा -- प्रवीण शिरसाठे उस्मानाबाद, अल्पसंख्यांक मोर्चा निहाल काझी ढोकी उस्मानाबाद, यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत.
 
Top