Views


सौ.सलमा सौदागर यांची रयत क्रांती संघटना (महिला आघाडी) कळंब शहर अध्यक्ष पदी निवड

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)


रयय क्रांती संघटना महिला कंळब शहर अध्यक्ष पदी सलमा सौदागर यांची निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र रयत क्रांती संघटना ( महिला आघाडी) उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष सौ.सोनाली शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले. 
या निवडी बद्दल रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आ.सदाभाऊ खोत यांनी दूरध्वनीच्या माध्यमातून सलमा सौदागर यांचे अभिनंदन केले आहे. रयत क्रांती संघटना शेतकरी, शेतमजूर,कामगार, विद्यार्थी, महिला व समाजातील सर्व घटकाला न्याय मिळवू देणार आहे, असे  सलमा सौदागर यांनी पत्रकाराशी बोलताना सांगितले.
 
Top