Views


केंद्र सरकारने कृषी सुधारणा कायदा केल्याने कृषी विधेयकाचे रयत क्रांती संघटना महिला आघाडीच्यावतीने कळंब येथे गुढी उभा करून समर्थन केले


उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

केंद्र सरकारने कृषी सुधारणा कायदा केल्याने कृषी विधेयकाचे रयत क्रांती संघटना महिला आघाडीच्यावतीने कळंब येथील शेतात महिलांनी गुढी उभा करून समर्थन केले. यावेळी सौ. सोनाली शिंदे म्हणाले, केंद्र सरकारने जो कृषी सुधारणा कायदा आणला आहे. तो शेतकऱ्यांच्या हिताचा असून त्यामुळे शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळणार आहे. शेतकऱ्यांला मार्केटिंग व्यवस्था उपलब्ध होणार आहे. मार्केट कमिटीच्या जाचातून मुक्त होणार आहे. शेतमाल मार्केट कमिटीच्या बाहेर विकण्याची मुभा मिळणार आहे. सरकारी हस्तक्षेप कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांची भीती नष्ट होणार आहे. तरी सर्वांनी या कायद्याचे स्वागत करावे हे आवाहन केले. शेतकऱ्यांना स्वातंत्र्य बहाल करणारे तीन विधेयके केंद्रशासनाने लोकसभा व राज्यसभा मध्ये मंजूर करून शेतकऱ्यांना स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना आपल्या शेतीमालाचे स्वातंत्र्य लाभलेली आहे. सदर मागणी स्वर्गीय शरद जोशी यांनी 40 वर्षांपासून लावून धरली होती. परंतु त्यावरती निर्णायक भूमिका कोणत्याही शासनाने घेतलेली नव्हती. स्वर्गीय शरद जोशी यांच्या जवळचे व त्यांच्या विचाराने प्रेरित झालेले माजी मंत्री सदाभाऊ खोत जेव्हा राज्यमंत्री झाले. तेव्हा पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये फळे व भाजीपाला नियमन मुक्ती करून सदर शेतीमालाच्या स्वातंत्र्याचे पहिले दार खुले केले होते. आणि त्यानंतर केंद्र सरकारकडे या तीन विधेयकातील शेतकरी हिताच्या विषयावरती वेळोवेळी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी पाठपुरावा केला होता. या शेतकरी हिताच्या निर्णयाला कायद्याचे स्वरूप देऊन तीन विधेयके मंजूर केली त्याबद्दल रयत क्रांती संघटना गुढी उभारुन त्याचे स्वागत केले आहे. यावेळी जिल्हाध्यक्षा सौ.सोनाली शिंदे, तालुकाध्यक्षा सौ.यास्मीन शेख कळंब, जिल्हा उपाध्यक्षा सौ.जयमाला निंगुळे, शहराध्यक्षा सौ.सलमा सोदागर कळंब, तालुकाध्यक्षा सौ.कुसुम इंगळे परंडा, तालुका उपाध्यक्षा सौ.विदया शिंदे कळंब, तालुकाध्यक्षा सौ.निर्मला पाटील उस्मानाबाद, शेतमजूर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top