Views


विजयकुमार मठपती यांचे दुःखद निधन 

             
 उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

मुरूम येथील नूतन प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक विजयकुमार शिवशंकर मठपती यांचे गुरुवारी (ता. १७) रोजी सकाळी अकरा वाजता अल्पशा आजाराने लातूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान दुःखद निधन झाले. ते ५७ वर्षांचे होते. ते मनमिळावू, मितभाषी स्वभावाचे असल्याने त्यांचा मोठा मित्र परिवार होता. विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून त्यांनी एक वेगळी ओळख या परिसरात निर्माण केली होती. त्यांच्या निधनाची बातमी कळताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मूळचे  लोहारा तालुक्यातील आष्टा कासार येथील रहिवाशी होते. त्यांच्या पश्चात वडील जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक, पत्नी, तीन मुले त्यापैकी एक मुलगा स्विझर्लंड देशात इंजिनिअर म्हणून कार्यरत असा परिवार आहे.
 
Top