Views


*ऑक्सीजन बेडस तात्काळ उपलब्ध करुन दयावेत-जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर*

*उस्मानाबाद:-(सैफोद्दीन काझी)*

         उस्मानाबाद,(दि.18)महाराष्ट्र शासनाने “महाराष्ट्र कोविड 19 उपाययोजना नियम, 2020 प्रसिद्ध केले असून यातील नियम क्र. 3 नुसार करोना विषाणुमुळे (COVID-19) उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण यासाठी जिल्हाधिकारी यांना त्यांचे कार्यक्षेत्रात सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहे.
      जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,उस्मानाबाद यांना प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार अधिष्ठाता, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, उस्मानाबाद यांना पुढीलप्रमाणे आदेशित  करित असल्याचे कळविले आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यामधील शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, उस्मानाबाद येथील DCHC मध्ये उपलब्ध असलेल्या ऑक्सीजन बेड्स 30 व जनरल बेड्स 50 असे एकुण 80 बेड्स पैकी 30 ऑक्सीजन बेड्स 24 तासांचे आत पूर्णत: कार्यान्वित करुन ऑक्सीजनची आवश्यकता असणा-या रुग्णांना हे ऑक्सीजन बेड्स उपलब्ध करुन द्यावेत.
          या रुग्णांवर उपचारासाठी तात्काळ डॉक्टर्स, नर्सेस व इतर वैद्यकीय कर्मचारी यांची नियुक्ती करावी.वरिलप्रमाणे कार्यवाही करुन अनुपालन अहवाल तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद येथील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षास सादर करावा.
      या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 ते 60 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 व इतर लागू होणा-या कायदेशीर तरतुदींनुसार दंडनिय/कायदेशीर कारवाईस पात्र राहील. असे आदेशात नमुद केले आहेत.
 
Top