Views


लोहारा तालुक्यात पावसामुळे सोयाबीन व अदि पीकांचे नुकसान झाल्याने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यात यावी, भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

लोहारा तालुक्यात पावसामुळे सोयाबीन व अदि पिकांचे नुकसान झाल्याने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकुर, आ.राणाजगजितसिंह पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, बुध्दीजीवी प्रकोष्ठ प्रदेश संयोजक तथा भाजप माजी जिल्हाध्यक्ष दत्ता भाऊ कुलकर्णी, युवा मोर्चा जिल्हाअध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी तहसीलदार विजय अधाने यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, लोहारा तालुक्यातील अनेक गावांत गेल्या पंधरा दिवसापासून अधून मधून पडलेल्या अतिवृष्टी पावसामुळे शेतकर्‍यांच्या शेतातील सोयाबीन, मूग, उडीद, आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेल्या व काढण्याच्या तयारीत असलेली सर्व शेतकऱ्यांच्या शेतातील पिके पाण्यात गेल्याने जाग्यावरच सडून कुजून जाण्यासह वापुन येत आहेत. त्यामुळे अगोदरच कर्जबाजारी व जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकरी राजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. यंदा चांगली बहरात आलेले पीक भरघोस उत्पादन होऊन आपल्या 7/12  वर कुटुंबावर असलेली कर्जाचे डोंगर कमी होईल या आशेपोटी शेतकरी दिवस रात्र कष्ट करून पिकवलेले पिक पावसामुळे मातीमोल झाले आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून आपल्या मुला, मुलींचे शिक्षण, लग्न घेतलेले बँकेचे व खाजगी सावकार, बचत गटाचे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत शेतकरी राजा अडकला असून या नैराश्यातून आत्महत्येसारखे पाऊल उचलण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतातील पिकांमध्ये पाणी साचून भयान संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी व आत्महत्येसारख्या घटनांना आळा घालण्यासाठी शासनाने तात्काळ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे सरसकट पंचनामे करून आर्थिक मदत अनुदान देण्यासह यंदाच्या खरीप हंगाम पूर्णता वाया गेल्याने सन 2020 -- 21 चा पिक विमा मंजूर करून तात्काळ शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करावा, जेणेकरून रब्बी हंगाम काही दिवसांवरच येऊन ठेपला असून जमिनीची मशागत व पेरणी करण्यासाठी किमान मदत होईल. प्रशासनाने शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी तात्काळ हेक्‍टरी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत येत्या पंधरा दिवसाच्या आत करावी, अन्यथा लोहारा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी थेट रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटील, जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेट्टी, भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, तालुका सरचिटणीस नेताजी शिंदे, नगरसेवक आयुब अब्दुल शेख, भाजप मीडिया तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, बालासिंग बायस, जिल्हा कार्यकारणी सदस्य कमलाकर सिरसाठ, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष बालाजी चव्हाण, ओबीसी तालुकाध्यक्ष दगडू तिगाडे, आदि, उपस्थित होते.

 
Top