Views


कळंब तालुका पत्रकार संघाचे कार्य सृजनात्मक - के व्ही सरवदे
 

कळंब:-( प्रतिनिधी ) 

कळंब तालुका पत्रकार संघ हा केवळ पत्रकारिता न करता सामाजिक कार्य करत असुन नवनवीन उपक्रम राबवित असतो त्यामुळे हा पत्रकार संघ सृजनात्मक पत्रकार संघ असल्याचे गौरवोद्गार जेष्ठ साहीत्यिक के व्ही सरवदे यांनी कळंब येथे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण प्रसंगी केले.
     यावेळी व्यासपीठावर प्रा संजय घुले, पत्रकार संघाचे विश्वस्त सतीश टोणगे, अध्यक्ष परमेश्वर पालकर, पुरस्काराथी शिक्षक अविनाश खरडकर उपस्थित होते.पुढे बोलताना सरवदे म्हणाले की पत्रकार संघ हा वर्षभर विविध उपक्रम राबवून समाजातील सर्व घटकांना सामावून घेत सामाजिक कार्य करत असतो त्यामुळे कळंब शहराला वेगळी ओळख निर्माण झाली आहे. यावेळी त्यांनी अविनाश खरडकर यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी पुरस्काराथी शिक्षक अविनाश खरडकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष परमेश्वर पालकर यांनी केले तर सूत्रसंचालन माधवसिंग राजपुत तर आभार रमेश अंबिरकर यांनी मानले. यावेळी कळंब तालुका पत्रकार संघाचे सदस्य दिलीप गंभीरे, सुभाष घोडके, मंगेश यादव, चेतन कात्रे, अमर चोंदे, ओंकार कुलकर्णी, दिपक माळी, खादीम सय्यद, शिवाजी सावंत, नगरपालिका शाळेचे मुख्याध्यापक मुकुंद नांगरे, मुख्याध्यापिका रेजा पायाळ, केंद्रप्रमुख सोमनाथ चंदनशिव, प्रशांत घुटे, नारायण बाकले आदी मान्यवर उपस्थित होते.


चौकट 

शिक्षक हाच राष्ट्राच्या भविष्याचा मजबूत पाया - घुले
आपण मुलांना देशाचे भविष्य म्हणतो परंतु हे भविष्य निर्माण करणारे शिक्षकच राष्ट्राचा पाया आहेत त्यामुळे हा पाया मजबूत करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने त्यांचे प्रोत्साहन वाढविणे आवश्यक आहे. आणि हे कार्य कळंब तालुका पत्रकार संघाच्या वतीने होत आहे. याचा आम्हाला अभिमान वाटतो असे गौरवोद्गार प्रा संजय घुले यांनी यावेळी काढले.

चौकट

अविनाश खरडकर हे कळंब शहरातील नगरपालिका शाळा क्रमांक 1 मध्ये सहशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी कोवीड च्या साथीमधये घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले असुन ते इयत्ता पहिलीतील मुलांना अध्यापन करतात आज त्यांच्या 50 टक्के मुलाना लिहायला आणि वाचायला येत आहे. लवकरच 100 टक्के मुलांना लिहायला आणि वाचायला येईल असे ते प्रयत्न करत आहेत. त्यांनी ॲनिमेशन द्वारे सुध्दा मुलांना मनोरंजनात्मक शिक्षण हा उपक्रम सुध्दा हाती घेतला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन कळंब तालुका पत्रकार संघाने त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविले आहे.
 
Top