भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी माेदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह परंडा तालुका भाजपाच्यावतीने वृक्षारोपण
उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)
भारत देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त परंडा भारतीय जनता पार्टीच्या वतीने भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कमांडो करीअर अकॅडमी, परंडा येथे निसर्ग उपयुक्त वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्रदेश अल्पसंख्याक चिटणीस ॲड.जहीर चौधरी, माजी सैनिक आघाडी जिल्हाध्यक्ष महाविर तनपुरे, जिल्हा चिटणीस ॲड.गणेश खरसडे, भाजपा तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील, सरचिटणीस विठ्ठल तिपाले, तानाजी पाटील, उमाकांत गोरे, दादासाहेब गुडे, साहेबराव पाडुळे, श्रीकृष्ण शिंदे, सारंग घोगरे, प्रमोद लिमकर, बाळासाहेब घोडगे, सागर पाटील, अमोल गोफणे, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.