*त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी --उमरगा भाजप शिष्टमंडळाच तहसीलदारांना निवेदन*
उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, या मागणीचे निवेदन उमरगा भाजपा शिष्टमंडळाने तहसीलदार संजय पवार यांच्याकडे सुफुर्द केले आहे. उमरगा तालुक्यात कांही दिवसांत पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली. त्यामुळे शेती शिवर जलमय झाल्याने हातातोंडाशी आलेल्या घास पाण्यात गेला. महसूल विभागातील पाचही मंडळातील सोयाबीन, उडीद,ऊस,व तुर पिकांचे नुकसान झाले असून त्वरीत पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देणाची मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आले. यावेळी शिष्टमंडळाने पाऊस वादळात तालुक्यात झालेल्या नुकसानीची माहिती महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. सरसकट शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळावी. विशेषता सोयाबीन, उडीद, ऊस, तुर, करणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा लाभ मिळावा. त्यांनी दिलेले हमीपत्र ग्राह्य धरण्यात यावे. सर्व पुके, ऊस शेती याचेही नुकसान झाले आहे. त्या शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळावी. अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली संबंधित यंत्रणेला भाजपा कार्यकर्ते व ग्रामस्थ पूर्ण सहकार्य करतील असे आश्वासन यावेळी देण्यात आले.
"पावसामुळे उडीद.सोयाबीन, मुग, ऊस या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे शासनाने कसल्याही प्रकारची जाचक अटी लावूनये सरसकट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची गरच आहे -- भाजप महाराष्ट्र कार्यकारी सदस्य संताजी चालुक्य
यावेळी भाजप महाराष्ट्र कार्यकारी सदस्य संताजी चालुक्य, भाजप जिल्हा सरचिटणीस माधव पवार, तालुकाध्यक्ष कैलास शिंदे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष माधव सलके, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष अमर सलके, युवा मोर्चा सरचिटणीस पंकज मोरे, साधू करके, राहुल आष्टे,आदी उपस्थित होते.