Views


पावसामुळे झालेल्या नुकसानीची ऑनलाईन/ऑफलाईन /लेखी तक्रार विमा कंपनीकडे / कृषी कार्यालयाकडे करावी - जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर


उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

 उस्मानाबादजिल्हयात मागील आठवडयात  पावसामुळे झालेल्या नुकसानीची जिल्हाधिकारी यांनी नुकतिच उस्मानाबाद परिसरातील प्रत्यक्ष  पाहणी केलेली असून यावेळी कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. पिक विमा भरलेल्या पिकांचे नुकसान झालेले असेल तर नुकसानीची माहिती विमा कंपनीस घटना घडल्यापासुन 72 तासाच्या आत करणे बंधनकारक आहे. नुकसानीच्या माहिती विमा कंपनीस व कृषि विभागास ऑनलाईन पध्दतीने Crop Insurance किंवा  Farmmitra या मोबाईल ॲपद्वारेच करणे अपेक्षित असून ज्या शेतकऱ्यांचे विमा भरलेल्या पिकांचे नुकसान झालेले आहे. अशा शेतकऱ्यांनी पिक नुकसानीची माहिती विमा कंपनीस व कृषि विभागास मोबाईल ॲपद्वारे  करावी. ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन तक्रार करता येत नाही.त्यांना कृषि सहायकांनी मदत करावी व जे शेतकरी लेखी तक्रार देतील त्या स्विकारुन तात्काळ विमा कंपनी प्रतिनिधी समवेत  पंचनामे करावेत, ऑनलाईन विमा न भरता आल्यामुळे  ज्या शेतकऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती  बँकेमध्ये  विमा भरला होता.  त्यांना ऑनलाईन तक्रारी करता येत नसल्यामुळे ऑफलाईन किंवा लेखी तक्रार विमा कंपनीकडे किंवा कृषि कार्यालयाकडे करावी. असे उपस्थित शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आवाहन केले आहे.
 
Top