Views


खंडेश्वरवाडी मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून वाहत असून या प्रकल्पाच्या भरावाला मोठी भेग, नागरीकांत भितीचे वातावरण आ.सुजितसिंह ठाकूर यांचे सतर्कतेचे निर्देश


उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

परंडा तालुक्यातील खंडेश्वरवाडी मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून वाहत असून या प्रकल्पाच्या भरावास वरील बाजूला आडवी मोठी लांब भेग पडली आहे. यामुळे शेतकऱ्यात व नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील प्रकल्पाच्या भरावास वरील बाजूला आडवी मोठी लांब भेग पडली आहे. या खंडेश्वरवाडी मध्यम प्रकल्पाची क्षमता 10.800 दलघमी आहे. परतीच्या पावसामुळे हा प्रकल्प शंभर टक्के भरला आहे. दरम्यान प्रकल्पाच्या भरावाला मोठी भेग पडली आहे. या प्रकल्पास धोका निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांसह नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकल्पावरील संभाव्य धोका लक्षात घेऊन यासंदर्भात भाजपा मुख्य प्रतोद विधान परिषद भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकूर यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार, जलसंपदाचे अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, शाखा अभियंता यांच्याशी संपर्क करून घ्यावयाची खबरदारी आणि करावयाच्या उपाययोजनांबाबत चर्चा केली. तसेच प्रभावी उपाययोजना व सतर्कतेचे आदेश दिल्याची माहिती आ. सुजितसिंह ठाकूर यांनी दिली.
 
Top