Views


हॉकी खेळाडू सुप्रिया कदम हिचा सन्मान

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

उस्मानाबाद, शहरातील समता माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी सुप्रिया सुभाष कदम-पाटील हिने विभागीय व राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत चांगली कामगिरी केल्याबद्दल तिचा दोन्ही स्पर्धेतील प्रमाणपत्रे देऊन सन्मान करण्यात आला. 2019 - 2020 या शैक्षणिक वर्षात समता विद्यालयाच्या मुलींच्या हॉकी संघाने नांदेड येथे झालेल्या विभागीय हॉकी स्पर्धेत विजेतेपद मिळवून कोल्हापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली होती, या राज्यस्तरीय स्पर्धेत सुप्रिया कदम व स्वराली नलावडे या दोघींनी चांगली कामगिरी केली होती, स्वराली नलावडे  हिची तर राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली होती, उस्मानाबादच्या इतिहासात मुलींच्या हॉकी संघाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड होण्याची पाहिलीच वेळ आहे, समता विद्यालयात सुप्रिया कदम हिच्यासोबत अन्य हॉकी खेळाडूंना प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक जोगदंड, क्रिडा शिक्षक बोबडे यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.

 
Top