भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी माेदी यांच्या वाढदिवसांनिमित सेवा सप्ताह परंडा तालुका भाजपाच्यावतीने कोविड रुग्णांसाठी फळ वाटप
उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)
भारत देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी माेदी यांच्या वाढदिवसांनिमित दि.14 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर या कालावधीत परंडा तालुका भाजपच्या वतीने सेवा सप्ताह कार्यक्रम अंतर्गत भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकुर यांच्या मार्गदर्शनावखाली जिल्हा उपरूग्णालय येथे कोविड रुग्णांसाठी फळ वाटप करण्यात आले. यावेळी भाजपा तालूकाध्यक्ष राजकूमार पाटील, सरचिटणीस विठ्ठल तिपाले, युवा मोर्चा तालूकाध्यक्ष अनिल पाटिल, दादा गुडे, सतीश देवकर, बाळू देशमुख, उमेश गोरे, अन्वर लूकडे, रमेश काळे, प्रमोद लिमकर, बाळासाहेब गोडगे, सागर पाटिल, आप्पा शिंदे, मनोहर मिस्किन, किरण देशमूख, श्रीकृष्ण शिंदे, रामा घोडके, ब्रम्हदेव उपासे, पाडूळे, राहूल जगताप, आदी उपस्थित होते.