Views


कळंब तालुक्यातील वडगाव  येथील शेतकरी कुटुंबातील डॉ.निखिल नवले हे
या भागातील पाहिले निवरो लॉ जिस्ट



कळंब:-(प्रतिनिधी)

    तालुक्यातील वडगाव  येथील शेतकरी कुटुंबातील डॉ.निखिल नवले हे
 या भागातील पाहिले निवरो लॉ जिस्ट झाले आहेत.ते या पुढे माय भूमीत च रुग्णांची सेवा करणार असल्याने ,त्यांचा फायदा रुग्णांना होणार आहे.ऑगस्ट या महिन्यात, Neurology या विषयावर  बोर्डाची घेतली जाणारी राष्ट्रीय पातळी वरील परीक्षा डॉ.निखिल नवले हे विशेष प्रविण्याने उत्तीर्ण झाले .  त्यांनी  या परीक्षेत कर्नाटमधील सर्वोच्च गुण मिळवले आहेत.
आपल्या जन्म भूमी प्रती असणारे प्रेम वा आपल्या मराठवायातील शेतकरी आणि कष्टकरी रुग्णाचा सेवे करता काम करण्याचे त्यांनी ठरविले असल्यामुळे ते उस्मानाबाद येथे लवकरच कार्यरत होत आहेत.
    त्यांचे उच्च शिक्षण हे भारतातील नावाजलेल्या बंगलोर मध्ये झाले.
तिथे त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कीर्तीचे गुरु लाभले.त्यांनी काही काळ या अशिया तील सर्वात मोठ्या  न्युरो सा यांस सेंटर  मध्ये ही काम केले.

तिथे त्यांनी 
"लहान मिंदू   याचा माणसाचा प्रज्ञा शक्ती वर असणारा परिणाम"
याचा वर संशोधन केले. त्यांचा शोध निबंध हा प्रकाशनाचा वाटेवर आहे. भारतामध्ये अश्याप्रकरे करण्यात आलेला पहिलाच संशोधन असावे.
   तिथे त्यांनी अर्धांगवायू, अपस्मार, झटके, मेंदू ज्वर, कंप वात, स्मृती ब्रंश, म्यास्थेनिया ग्रविस, neuropathy, myopathy, परापलेजिया, , इत्यादी विविध आजरा ने पीडित  असलेला रुग्णां चे निदान व उपचार केले.
त्यांनी त्यांचा  एम. डी.जनरल मेडीसिन 
ही डिग्री भारतातील पहिल्या  तीन क्रमांकात असलेल्या वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथे केले.
2012 मध्ये घेण्यात आलेल्या प्रावेश परीक्षेत ते देशात  तेरावे  आले होते. महाराष्ट्र मधून तिथे मेडीसिन ला फक्त तीन डॉक्टरच निवडले होते.
त्यांना महाराष्ट्र राज्य सह कर्नाटक व नवी दिल्ली इथे ही काम करायची संधी होती
परंतू भारतीय लषकरात काम करायची इच्छा असल्याचे त्यांनी  कुटुंबाला बोलून दाखवली व कुटुंबतील  सर्व जण ही तयार झाले.
ए फ.एम. सी पुणे इथे बौद्धिक तसेच शरारिक तयारी ला सुरूवात  झाली
तिथे ही त्यांनी आपली छाप पाडली.
तिथे त्यांनी एच. आय. व्ही. बाधित सैनिकांचा  अनिमिया वर  संशोधन केले.
तिथे असताना त्यांनी राष्ट्रीय पातळीवर चा परिषदे मध्ये पोस्टर प्रदर्शन केले.
2012  रोजी कामावरून घरी जात असताना पुण्यातील परिसरात त्यांचा मोटर सायकल चा अपघात झाला.
त्यांना हाथ पाय कंबर खुबा फासल्या यानां गंभीर जखम झाली होती. हेल्मेट घातले असल्या मुळे मेंदू ला जास्त हानी नव्हती पोचली.त्यांनी पुण्यातील जेहांगिर व कमांड  हॉस्पिटलमध्ये उपचार झाले.
अपघातानंतर अर्धा डझन शस्त्रक्रिया करून येथील डॉक्टरांनी त्यांचे प्राण वाचवले. नंतर काही दिवसांनी जेव्हा त्यांना शुध्दी आली आणि झालेला प्रकार कळला त्यावेळेस ते पार कोलमडून गेले. त्यांचा उजवा हात  निकामी झाला होता व तो काम करणे अशक्य होते. 
स्वतः डॉक्टर असल्याने त्यांना त्यांची वस्तुस्थिती लगेच लक्षात आली. 
आता सर्व संपले आहे अशी धारणा झाली.
परंतु कुटुंबातील सदस्य आणि मित्र मंडळी याने धीर द्यायचा काम केले.
 ए.फ.एम. सी.तील सर्व सहकारी व उच्च पदस्थ अधिकारी ही जातीने त्यांचा प्रकृती वर लक्ष ठेवून होते.
या वेळी  सर्व अधिका-यांनी खूप सहकार्य केले.त्यांना पुन्हा नव्याने सरूवात करण्याची प्रेरणा दिली 
 अपघात मुळे आलेल्या विकलांगते मुळे ते भारतीय सेनेत रुजू होऊ शकले नाहीत. व त्यांचं देश सेवेचं स्वप्नं अपुर राहिला. तरी ही सामान्य रुग्ण सेवा ही तितकीच महत्त्वाची असून ती सुरू करण्याची प्रेरणा त्यांचा सेने तील उच्च आधिकरी यांनी व्यक्त केली.
त्यांनी एम.बी.बी.एस.ही पदवी  कोल्हापूर  येथे पूर्ण केली.त्यांनी कोल्हापूरजवळील शाहूवाडी तालुक्यात तील कळे कुडित्रे  या दुर्गम भागात रुग्णसेवे चे काम केले.

 तालुक्यातील वाडगाव ज.  येथील शेतकरी व वारकरी कुटुंबात जन्मलेल्या श्री बिभीषण भीमराव नवले व सौ कमल ताई नवले यांचे ते कनिष्ठ चिरंजीव आहेत.श्री नवले साहेब ह्यांनी चाळीस वर्ष सहकार शेत्रात काम केले .
सुरुवातीला शेतकी अधिकारी म्हणून भोगावती, तुळजाभानी, या जिल्यातील साखर कारखानात  काम केले .... 
तिथेच  निखिल व त्यांचे मोठे भाऊ व बहीण यांचं शिक्षण साखर शाळेत सुरू झाले .आई कमल ताई यांचा मनोदयाने त्यांनी मुलांचा शिक्षणासाठी सोलापूर ला घर करायचे ठरवले.
सोलाुरातील प्रसिद्ध शाळेने ग्रामीण भागातून असल्यामुळे  प्रवेश नाकारला.
श्री नवले यांचे मित्र असलेले राजन गांधी यांचा मदती ने निखिल चा दाखला सोलापूर मध्ये करण्यात आला तिथे त्याने पहिली पासून दहावी पर्यंत प्रथम पाच क्रमांक मध्ये राहण्याचा मान मिळाला. 
 नंतर दयानंद महाविद्यालय सोलापूर इथे प्रवेश घेतल.आई कमल ताई नवले ह्या वडगाव जहागीर चा विद्यमान सरपंच आहेत.त्यांचे थोरले बंधू श्री निलेश नवले हे अमेरिकेत संगणक अभियंता म्हणून दहा वर्षांपासून कार्यरत आहेत. 
त्यांची भगिनी स्वाती नवले ह्या महिला व बालविकास खात्यात पुणे येथे अधिकारी आहेत.त्यांची पत्नी  डॉ.प्रियंका नवले  
ह्या सध्या सोलापूर येथील काम करत आहेत
 
Top