Views


आष्टा कासार येथे ग्राम सोयाबीन बीज उत्पादन समिती स्थापन

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

लोहारा तालुक्यातील आष्टा का येथे ग्राम बीज उत्पादन समिती स्थापन करण्यात आली. ही समिती स्थापन करण्यासाठी कृषी सहाय्यक श्री सचिन पवार, अनिल वामन भोरे,  सहयोगी प्राध्यापक कोरडवाहू कृषी संशोधन केंद्र महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी सरपंच सुनील सुलतानपूरे, व्यंकटे चौधरी, सिद्राम तडकले, मुकेश मुळे, गणेश शिदोरे, बालाजी कोरे, धनराज सुलतानपूरे, खंडू शेरीकर, नागनाथ मदने, कृषी मित्र पिंटू मदने, यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.
 
Top