*सीना कोळेगाव धरणात कुकडी व भीमा प्रकल्पातील वाहून जाणारे अतिरिक्त पाणी सोडणे बाबतचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे परांडा तहसीलदार यांना निवेदन*
उस्मानाबाद:-(सैफोद्दीन काझी)
सोमवार(दि 7)रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने कुकडी व भीमा प्रकल्पातील वाहून जाणारे अतिरिक्त पाणी कोरड्या असलेल्या सीना कोळेगाव प्रकल्पात सोडण्यात यावे. यासाठी भुम परांडा वाशी चे मा.आमदार राहुल भैय्या मोटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परांडा यांच्या वतीने परांडा तहसीलदार श्री.सुपे साहेब यांच्याकडे निवेदन देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्री.संदीप पाटील, युवक चे तालुकाध्यक्ष श्री.धनंजय पाटील,माजी जी.प.सदस्य धनंजय आबा मोरे,सामाजिक न्याय विभाग जिल्हा अध्यक्ष मा.राहुल बनसोडे,डी.सि. सि. बँकेचे संचालक हनुमंत कोलते पाटील,भाऊसाहेब हुके, बबलू शिंदे,प्रा.शरद झोंबाडे ,मयूर जाधव गोसाविवाडी आदी उपस्थित होते.