Views


*मुजीब पठाण यांची मराठवाडा विभागीय उपाध्यक्षपदी निवड*

कळंब:-(प्रतिनिधी)

रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी मा.आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशानुसार मुजीब महेबूब पठाण (रा.ढोकी ता.जि. उस्मानाबाद) यांची मराठवाडा विभागीय (पश्चिम) उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सागर डबरासे व प्रदेश उपाध्यक्ष प्रा.युवराज धसवाडीकर यांच्या वतीने आज लातूर येथे पठाण यांना नियुक्ती पत्र देऊन पुढील कार्यासाठी शुभेच्छा प्रदान करण्यात आल्या! 
याप्रसंगी, रिपब्लिकन सेनेचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष अनिल हजारे यांच्या शिफारशीनुसार, अब्दुल सलाम अब्दुल समद पटेल यांची उस्मानाबाद जिल्हा उपाध्यक्षपदी तर राजाभाऊ गोरोबा आल्टे यांची कळंब तालुका संघटकपदी नियुक्ती करण्यात आली. लातूर जिल्हाध्यक्ष (उत्तर) राम कोरडे यांच्यासह, उस्मानाबाद युवा जिल्हाध्यक्ष स्वप्नील शिंगाडे, कळंब तालुकाध्यक्ष लाखन गायकवाड, युवा नेते सूरज वाघमारे, ॲड. धनंजय मस्के, अस्लम शेख व इतर कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

 
Top