Views


शिक्षकांकडून बसवंतवाडी येथील विद्यार्थ्यांना स्वाध्यायपुस्तिकांचे वाटप

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

 तुळजापूर तालुक्यातील बसवंतवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या सहभागातून इयत्ता पहिली ते सातवी मधील विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शनपर स्वाध्यायपुस्तिकांचे वाटप शनिवार दिनांक 12 सप्टेंबर रोजी करण्यात आले. कोरोनाच्या  पार्श्वभूमीवर सध्या शाळा बंद असल्याने ऑनलाइन शिक्षण घेतले जात आहे. परंतु ग्रामीण भागातील बऱ्याच पालकांकडे स्मार्टफोन उपलब्ध नाहीत व घेण्याची होण्याची परिस्थिती ही नाही. यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री उंबरे व त्यांचे सहकारी यांच्या वतीने स्वाध्याय पुस्तिका तयार करून त्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी  शाळा व्य. समितीचे अध्यक्ष श्री. जगन्नाथ शिंदे - पाटील, मुख्याध्यापक पोपट उंबरे, शिक्षक श्रीमंत टेंगळे, प्रमोद चौधरी, दिपक ढोणे, राजकुमार घोडके, धोंडिबा गारोळे, रामचंद्र शिंदे व सुसेन सुरवसे यांनी परिश्रम घेतले.


 
Top