Views


मराठा आरक्षणासाठी सकल मराठा आरक्षण क्रांती मोर्चा च्या वतीने  निवेदन


कळंब:-(प्रतिनिधी)

मराठा आरक्षणासाठी सकल मराठा आरक्षण क्रांती मोर्चा च्या वतीने  निवेदन. देण्यात आले..
       उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय कळंब मार्फत पंतप्रधानांना निवेदन
मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत मे.सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांनी दिनांक ०९ सप्टेंबर २०२० रोजी  महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणासाठी स्थगिती दिलेली आहे त्यामुळे महाराष्ट्रातील मराठा समाजास जबर फटका बसलेला आहे मराठा समाज कायम आरक्षणापासून कायम वंचित राहिलेला आहे. मराठा समाजाच्या मागण्या आहेत की मराठा आरक्षणाबाबत कोणताही निर्णय होईपर्यंत कोणत्याही स्वरूपाची शासकीय नोकर भरती करण्यात येऊ नये.मराठ्यांना लागू असलेले सध्याचे आरक्षण कायम ठेवण्याचे अद्यादेश सरकार ला काढता येतो तो सरकारने काढावा व आरक्षणाचा लाभ चालू ठेवावा.
    यावेळी उपस्थित   शिवाजी आप्पा कापसे बाळकृष्ण भवर सर  अतुल गायकवाड , गजानन चोदें, प्रदिप मेटे, ॲड तानाजी चौधरी ज्योतीताई सपाटे, ॲड मनोज चोदें,सागर बाराते ,चेतन काञे, विकास गडकर,ज्ञानेश्वर पतंगे, दिपक जाधव, बालाजी निरफळ, ॲड मंदार मुळीक, ॲड प्रविण यादव, विकास थोरात, जगदीश गवळी, गजानन फाटक या सह अनेक क्रांती मोर्चा कळंब चे मावळे उपस्थित होते.
 
Top