Views


पत्रकार निंबरगे यांची भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या तालुका अध्यक्षपदी निवड

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

मुरूम येथील पत्रकार महेश निंबरगे यांची भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या उमरगा तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रकांत पाटील व प्रदेश उपाध्यक्ष शांताराम खुडे यांनी निंबरगे यांची नियुक्ती केली आहे. निंबरगे हे गेल्या 15 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहेत. वृत्तपत्राच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील प्रश्नांना शासन दरबारी मांडण्याचा प्रयत्न ते सातत्याने करीत आहेत. याशिवाय बसवेश्वर युवक मंडळ आणि शिवशांती सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी ते नेहमीच अग्रेसर असतात. समितीच्या तालुकाध्यक्षपदी त्यांची निवड झाल्याने पत्रकार संघटना तसेच विविध सामाजिक संघटनेच्यावतीने पत्रकार निंबरगे यांचे विशेष अभिनंदन करण्यात येत आहे.

 
Top