Views




*महिला बचत गटांनी मायक्रोफायनान्स कडून घेतलेल्या कर्जाच्या वसुलीचा तगादा तात्काळ थांबला पाहिजे यासाठी उस्मानाबाद मनसेचे जिल्हाधिकारी यांना निवेदन.....*

*पुढील ४/५ महिने खासगी फायनान्स वाल्यांनी महिला गटांना त्रास न देण्याची मनसेची तंबी.....*

 उस्मानाबाद:-(सैफोद्दीन काझी)

    उस्मानाबाद जिल्ह्यात शहरी आणि ग्रामीण भागात काही खासगी फायनान्स कंपन्या महिलांचे गट निर्माण करून त्यांना घरगुती उद्योग करण्यासाठी काही कर्ज उपलब्ध करून देत असतात तसेच दर महिन्याला त्यांच्या कडून या कर्जाची वसुली केली जाते परंतु मार्च महिन्यापासून कोरोनाच्या महाभयंकर आजाराचा वाढता प्रादुर्भाव आटोक्यात यावा म्हणून केलेल्या टाळे बंदी (लॉक डाऊन) मुळे सर्वांचेच सर्वच व्यवहार ठप्प झाले,लहान-सहान घरगुती उद्योग बंद पडल्याने महिला गटांना घेतलेल्या कर्जाचे हफ्ते भरण्यास अडचणी येऊ लागल्याने सरकारने ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत या कर्जाच्या हफ्त्यांची वसुली करण्यास फायनान्स कंपन्यांना मनाई केलेली होती,परंतु आता हा मनाई आदेश संपुष्टात आल्याने या फायनान्स कंपन्यांच्या प्रतिनिधिंनी महिलांकडे कर्जाच्या वसुलीसाठी तगादा लावण्यास सुरुवात केलेली असल्याने स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी कर्ज घेतलेल्या महिला वर्गामध्ये कमालीचे नैराश्य पसरलेले आहे आणि उद्योग-धंदा बंद झालेल्या पंढरपूर,जिल्हा सोलापूर येथील मनीषा अभय निकम या महिलेने कर्जाच्या हफ्त्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केलेली आहे,असे अनुचित प्रकार भविष्यात टाळता यावे म्हणून या खासगी फायनान्स वाल्यांनी लॉक डाऊन काळात महिला गटांना दिलेल्या कर्जाच्या परतफेडीसाठी तगादा लावू नये, म्हणून पक्षाचे सरचिटणीस आणि सहकार सेनेचे अध्यक्ष मा.दिलीप बापू धोत्रे तसेच शेतकरी सेनेचे श्री संतोषजी नागरगोजे यांनी हा विषय माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या कानावर ही घातलेला आहे.
    सर्व दैनंदिन व्यवहार पूर्वपदावर येण्यासाठी अजून ४/५ महिने लागणार असल्याने त्यानंतर वसुलीची प्रक्रिया सुरू करावी सध्या कोणत्याच महिलांना कर्जाच्या परतफेडीसाठी त्रास देऊ नये तसेच लॉक डाऊन काही प्रमाणात शिथिल करण्यात आलेले असले तरी उद्योग धंदे पूर्णतः कोलमडले आहेत या आधी या महिलांनी कर्जाचे हफ्ते वेळेवर भरलेले आहेत,कर्जाचा भरणा करणाऱ्या या महिला गटांना पुढील कर्ज उपलब्ध करून देऊन महिलांच्या सबळी करणासाठी ही चळवळ सुरू ठेवावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना या विषयावर या महिला गटांच्या पाठीशी उभी राहणार आहे तसेच अरेरावी करणाऱ्या खासगी फायनान्स कंपन्यांच्या विरोधात आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या विरोधात आक्रमक होऊन कायदा हातात घेण्यास ही मागे पुढे पाहणार नाही,तरी जिल्हा अधिकाऱ्यांनी या महत्त्वाच्या असलेल्या विषयावर लक्ष घालून योग्य निर्णय घ्यावा अश्या आशयाचे निवेदन आज उस्मानाबाद मनसेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले.
    यावेळी जिल्हा अध्यक्ष राजेंद्रजी गपाट , उस्मानाबाद चे तालुका अध्यक्ष पाषाभाई शेख,संतोष बारकुल,मनसेचे पदाधिकारी तसेच जिल्ह्यातील महिला गटांच्या प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

 
Top