Views


विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाईन व ऑनलाईन होणार —कुलगुरू डाॅ.प्रमोद येवले


उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या, अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाईन  व ऑनलाईन नियोजनबध्द होणार असुन परीक्षांना सामोरे जातांना विद्यार्थ्यांनी न घाबरता सामोरे जावे .परीक्षांचे वेळापञक विद्यापीठातील सर्व महाविद्यालयांना पाठवले असुन  कोरोना संकट काळातील ही परीक्षा पध्दती, रामकृष्ण परमहसं महाविद्यालयातील प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना समजुन सांगावी कारण रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचा जनमानसात प्रभाव आहे.असे प्रतिपादन डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ.प्रमोद येवले यांनी रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील प्राध्यापक यांना "परीक्षा पध्दती"या विषयावर मार्गदर्शन करतांना आज दि.११सप्टेंबर रोजी,केले आहे.अध्यक्षस्थानी प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख होते.यावेळी कुलसचिव डाॅ.जयश्री सुर्यवंशी(डाॅ.बा.आ.म.वि.औ,बाद), डाॅ.गायकवाड(डाॅ.बा.आं.म.विद्यापीठ उपकेंद्र संचालक,उस्मानाबाद)उपस्थित होते.प्रारंभी मान्यवरांनी शिक्षणमहर्षी डाॅ.बापूजी साळुंखे व संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांचे पुतळ्याचे पुजन केले.यावेळी रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाला नुकताच केंद्र सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ बायोटेक्नाॅलाॅजी यांचा "स्टार काॅलेजचा दर्जा मिळाल्याबद्दल कुलगुरू डाॅ.प्रमोद येवले यांनी प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख यांचा सत्कार करून अभिनंदन केले व सायन्स विभागाची गिरीजा लोखंडे या विद्यार्थिनीला वाद्यापीठाचे मार्च १९च्या, परीक्षेत गोल्डमेडल मिळाले होते तिचाही सत्कार कुलगुरूंच्या हस्ते करण्यात आला. पुढे बोलतांना कुलगुरू डाॅ.येवले म्हणाले की,अंतिम वर्षाच्या परीक्षा या बहुपर्यायी स्वरूपाच्या होणार असून, साठ प्रश्न असलेली प्रश्नपञिका असेल त्यातील पंन्नास प्रश्न विद्यार्थ्यांनी सोडवयाचे आहेत. परीक्षाची पूर्वतयारी म्हणून प्राध्यापकांनी "कोशेन बँक"तयार करून विद्यार्थ्यांना द्याव्यात विद्यापीठही आपल्या वेबसाईटवर " माॅडेल कोशेन बँक" व "व्हिडिओ" उपलब्ध करून देणार आहे.जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा देण्याचे शेवटी त्यांनी आवाहन केले आहे.यावेळी कुलगुरू समवेत डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य  महाविद्यालयात उपस्थित होते त्यांचे स्वागत प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख यांनी केले. सूञसंचालन परीक्षा प्रमुख प्रा.डाॅ.देविदास इंगळे यांनी केले आभार डाॅ.केशव क्षीरसागर यांनी मानले.यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक सोशेल डिस्टन्सिंगचे नियम पाळुन उपस्थित होते.

 
Top