Views


भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेश चिटणीस पदी निवड झाल्याने भाजपा परंडा शहराध्यक्ष ॲड.जहीर चौधरी यांनी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील यांच्याकडे सुपुर्द केला

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

ॲड.जहीर चौधरी यांनी परंडा भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा भाजपा तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील यांच्याकडे सुपुर्द केला आहे. या राजीनामा या पत्रात म्हटले आहे की, भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या आदेशान्वये महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेश चिटणीस पदी निवड झाल्याने माझा शहराध्यक्ष पदाचा मी राजीनामा देत आहे. या वेळी विठ्ठल तिपाले, प्रमोद लिमकर, ॲड संदीप शेळके, पै.बाळासाहेब गोडगे, सागर पाटील, सुखदेव इंगळे, आदी उपस्थित होते.

 
Top