Views


ऑर्गनायझेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी संस्थेच्या सदस्यांची कामगिरी विहिरीत 4 दिवसापासून पडलेला कोल्हा यास सुखरूप बाहेर काढून जीवदान दिले

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

लोहारा तालुक्यातील मोघ खुर्द येथील कांत पाटील यांच्या शेतातील विहिरीत गेल्या 4 दिवसापासून एक कोल्हा पडलेला होता. या कोल्ह्याला सुखरूप बाहेर काढून जीवदान देण्यात ऑर्गनायझेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी कन्झरर्वेशन संस्थेच्या सदस्यना यश आलाय, विहीर खोल असल्यामुळे व विहिरीतून बाहेर यायला पायऱ्या नसल्यामुळे विहोरीत पडलेल्या कोल्ह्याला बाहेर येता येत नव्हते, शेतकऱ्यांनी खूप प्रयत्न केले पण काही केल्या कोल्ह्याला बाहेर काढण्यात त्यांना यश आले नाही सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने वरचेवर विहिरीतल्या पाण्याची पातळी वाढून कोळ्याच्या जीवाला धोका निर्माण होत होता. म्हणून शेतकऱ्यांनी ऑर्गनायझेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन संस्थेचे उपाध्यक्ष श्रीनिवास फुलसुंदर यांना संपर्क साधला घटनेची माहिती मिळताच संस्थेचे सचिव अभिजित गायकवाड, श्रीनिवास फुलसुंदर , विरेश स्वामी, शैलेश जट्टे, गोपाळ सुतार, परमेश्वर चीकटे, धनराज जाधव, काका सुतार, टीम घटना स्थळी दाखल झाली व मोठ्या शिताफीने कोल्ह्याला विहिरीतून बाहेर काढून जीवदान दिले. यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
 
Top