Views


भूकंपग्रस्त उमेदवारांच्यावतीने खा.आओमराजे निंबाळकर यांना विविध मागण्यांचे निवेदन 


लोहारा:-(इकबाल मुल्ला)
1993 साली किल्लारी येथे झालेल्या भूकंपामुळे झालेले अतोनात नुकसान पाहून राज्य शासनाने बाधित गावातील लोकांना वर्ग 3 व वर्ग 4 च्या नोकरीत 2 टक्के आरक्षण लागू केले. परंतु आज भूकंपाच्या 27 वर्षांनी सुद्धा बाधित गावातील उमेदवारांना नोकरी मिळत नाही. यामुळे उस्मानाबाद मतदारसंघाचे खा.ओमराजे निंबाळकर यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात प्रामुख्याने भूकंपग्रस्ताचे संपूर्ण अनुशेष भरून काढावे, 2 टक्के आरक्षणाची काटेकोर अंमलबजावणी करावी, भूकंपग्रस्त उमेदवाराकडून निवड परीक्षेच्या, परीक्षा शुल्क माफ करावे अशी मागणी केली आहे. या निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते महादेव कारभारी, किशोर होनाजे, तानाजी शिवरे, विक्रम दासमे, अदिंच्या सह्या आहेत.
 
Top