Views


कोरोना प्रतिबंध क्षेत्रात श्री गणेश स्थापना संबंधीत गल्लीत मंदिरात करुन सकाळ संध्याकाळ पाच अथवा जणांना नित्य आरतीस परवानगी द्यावी-- आ. सुजितसिंह ठाकूर


लोहारा:-( इकबाल मुल्ला)
कोरोना प्रतिबंध क्षेत्रात श्री गणेश स्थापना संबंधित गल्लीतील मंदिरात करून सकाळ - संध्याकाळ 5 अथवा 3 जणांना नित्य आरतीस परवानगी देण्यात यावी, अशा मागणीचे पत्र भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर यांनी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांना दिले आहे. या पत्रात म्हटले आहे की, दिनांक 22 ऑगस्टपासून सार्वजनिक गणेशोत्सवास प्रारंभ होत आहे. महाराष्ट्रात गणेशोत्सवास खूप मोठे महत्त्व व परंपरा आहे. प्रतिवर्षी गणेश मंडळे सार्वजनिक गणेश श्री गणेशाची स्थापना गल्लीत गावात करीत असतात मात्र या वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे याला मर्यादित स्वरूप आले आहे. ज्या गावात गल्लीत कोरोना प्रतिबंधित क्षेत्र आहे. अशा ठिकाणी श्री गणेशाची मंडळांना प्रतिवर्षाप्रमाणे परंपरा खंडित न होऊ देता शेड उभारणी ऐवजी लगतच्या मंदिरात श्री गणेश मूर्तीची स्थापना करण्यास परवानगी देणे आवश्यक आहे. कांही तहसीलदार यांनी कोरोना प्रतिबंध क्षेत्रात श्रीगणेशाची स्थापना करण्यास मनाई आदेश काढले आहेत. हे अनेक वर्षाची नित्य प्रथा, परंपरा खंडित करणारे ठरेल. असे न करता कोरोना प्रतिबंधित क्षेत्रात श्रीगणेशाची प्रतिष्ठापना ऐवजी लगतच्या मंदिरात करण्यास परवानगी दिली जावी. तसेच श्री गणेशोत्सव काळात श्री ची सकाळ - संध्याकाळ नित्य आरती पूजा करण्यास मंडळाच्या केवळ 5 अथवा 3 सदस्यांना अटी व नियमांसह परवानगी देण्यात यावी, अशी मागणी पत्रात केली आहे.

 
Top