Views


आ. सुजितसिंह ठाकूर यांच्यासह कुटुंबातील सदस्य कोरोणावर मात करून घरी आले 


लोहारा:-(इकबाल मुल्ला)
श्री गणेश आगमनाच्या पूर्वसंध्येला भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकूर व कुटुंबातील सर्व सदस्य कोरोनावर मात करून दि.21 ऑगस्ट रोजी घरी परतले. आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्यासह कुटुंबातील 12 सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती. आ. ठाकूर यांचे 14 जणांचे एकत्रित कुटुंब आहे. या परिवारातील 12 जणांना बाधा झाली होती. त्यापैकी 6 जण कोरोनाची लक्षणे नसल्याने शेतात विलगीकरणात बरे झाले. आ. ठाकूर यांच्या मातोश्री बार्शी येथील खासगी रुग्णालयात उपचार घेऊन 4 दिवसापूर्वी घरी परतल्या. आमदार ठाकूर यांच्यासह पत्नी मुलगी, वडील, लहान भाऊ, हे दिनांक 14 ऑगस्ट पासून डॉक्टर योगेश सोमानी यांच्या मार्गदर्शनात नर्सिंग दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल बार्शी येथे उपचार घेत होते.
 
Top