Views




वॉर रूम व टोल फ्री क्रमांकाचा जास्तीत जास्त नागरिकांनी फायदा घ्यावा - जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे, टोल फ्री क्रमांक १८००२३३८२०० हा नंबर २४ तास सुरू असणार

उस्मानाबाद:-(सैफोदीन काझी)
    उस्मानाबाद जिल्हा प्रशासनाने कोविड - १९ च्या पार्श्र्वभूमीवर जिल्ह्यातील जनतेला यासंदर्भात देण्यात येणाऱ्या सोयीसुविधा व इतर सर्व बाबींची माहिती तात्काळ मिळावी. यासाठी  वॉर रूम व टोल फ्री क्रमांक ही सेवा जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू करण्यात आली आहे. या वॉर रुम व टोल फ्री क्रमांक सेवेचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी फायदा घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील कक्षात कोविड -19 वॉर रूमचे उद्घाटन आज सकाळी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी रूपाली आवले, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, जिल्हा आयुष अधिकारी तथा वॉर रूमचे नोडल अधिकारी डॉ. गजानन परळीकर, व बीएसएनएलचे जिल्हा प्रबंधक व्ही.के. बोईने जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सुर्यवंशी आदी उपस्थित होते. पुढे बोलताना जिल्हाधिकारी मुधोळ - मुंडे म्हणाल्या की, कोविड-19 अर्थात कोरोना आजाराबाबत योग्य ती माहिती, समुपदेशन व मार्गदर्शन मिळावे. यासाठी वॉर रूम तयार करण्यात आली असून त्यासाठी टोल फ्री क्रमांक १८००२३३८२००  हा नंबर २४ तास सुरू करण्यात आला आहे. या क्रमांकावर कोणत्याही नागरिकाने माहिती विचारली असता त्यांना माहिती देण्यासाठी तीन शिफ्टमध्ये डॉक्टरांची तज्ञ मंडळी नियुक्त करण्यात आली असून त्यांच्यामार्फत आवश्यक ती सर्व माहिती संबंधितांना देण्यात येईल. तसेच जिल्हास्तरीय वॉर रूम व तालुकानिहाय संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे- जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद- ०२४७२-२२५६१८, तहसील कार्यालय, उस्मानाबाद- ०२४७२-२२७८८२, तहसील कार्यालय, तुळजापूर- ०२४७१-२४२०२७, तहसील कार्यालय, कळंब- ०२४७३-२६२२५४, तहसील कार्यालय, उमरगा- ०२४७५-२५२०३७, तहसील कार्यालय,  लोहारा- ०२४७५-२६६५०७, तहसील कार्यालय, वाशी- ०२४७८-२७६२५०, तहसील कार्यालय, परंडा- ०२४७७-२३२०२४ व  तहसील कार्यालय, भूम- ०२४७८-२७२०२४ हे क्रमांक सुरु करण्यात आले आहेत.

 
Top