Views


जिल्हाधिकारी कार्यालयात क्रांतीसिंह नानासाहेब पाटील यांची जयंती साजरी

उस्मानाबाद:-(प्रतिनिधी)
 क्रांतीसिंह नानासाहेब पाटील यांची जयंती उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात दि.३ ऑगस्ट रोजी साजरी करण्यात आली. यावेळी क्रांतीसिंह नानासाहेब पाटील यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी रुपाली आवले, उपजिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी  अनिल सूर्यवंशी, जिल्हा आयुष अधिकारी तथा वॉर रुम नोडल अधिकारी डॉ.गजानन परळीकर आदी उपस्थित होते.

 
Top