साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने भिमराज ग्रुप चिंचपूर ढगे यांच्याकडून वृक्षारोपणाचा
भूम (आसिफ जमादार)
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने अभिवादन करून भिमराज ग्रुप चिंचपूर ढगे यांच्याकडून वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न.
तालुक्यातील चिंचपूर ढगे येथे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पूजा पाठ व अभिवादन करण्यात आले तसेच भीमराज ग्रुपच्या वतीने भीम नगर येथे वृक्षारोपण करण्यात आले.
दरम्यान चिंचपूर ढगे तालुका भूम
येथील भिमराज ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या वर्गणीतून या भागाला उन्हाळ्यामध्ये पाण्याची चणचण भासत होते या वर्गणी च्या माध्यमातून या ग्रुपच्या वतीने बोर घेऊन या बोरला चांगले पाणी लागल्याने येथील भिम नगर व साठेनगर भागाला मुबलक पाणी मिळत आहे त्यानिमित्ताने भिमराज ग्रुपचे येथील लोकांनी समाधान व्यक्त करून त्यांचे अभिनंदन केले.
आज अण्णाभाऊंच्या जयंती निमित्ताने सामाजिक कार्यकर्ते अर्जुन सोनवणे मामा यांच्या हस्ते वृक्षारोपण करून हे वृक्ष वाढवण्याचा संकल्प भीमराज ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केला.
याप्रसंगी भिमराज ग्रुप चे अध्यक्ष विश्वजीत सोनवणे, संगतीत सोनवणे, कार्याध्यक्ष विशाल कसबे, संदीप सोनवणे, रोहित सोनवणे, नाना सोनवणे युवराज कुचेकर, बाबा मस्के , महादेव सोनवणे, उत्रेश्वर सोनवणे, राहुल आढागळे,वैभव सोनवणे,शाहरुख पठाण आदी उपस्थित होते.