Views



*श्रीगणेशोत्सव कालावधीत  22 व 29 ऑगस्ट रोजीच्या जनता कर्फ्यू मध्ये शिथिलता-जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर*

उस्मानाबाद:-(सैफोदिन काझी)

श्रीगणेशमूर्तीची व अनुषंगिक साहित्याची विक्री करणारीदुकाने चालू ठेवण्यास परवानगी.शुक्रवार (दि.21) महाराष्ट्र शासनाने 'महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम, 2020 प्रसिद्ध केले असून यातील नियम क्र. 3 नुसार करोना विषाणुमुळे (COVID-19) उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण यासाठी जिल्हाधिकारी यांना त्यांचे कार्यक्षेत्रात सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहे.
         कोरोना कोविङ-19 विषाणुमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरिता व त्यावर नियंत्रण आणण्यासाठी  दि. 31 ऑगस्ट 2020 पर्यंत उस्मानाबाद जिल्ह्यात लॉकडाऊन वाढविण्यात आले असून लॉकडाऊनमध्ये करावयाच्या कार्यवाहीबाबत आदेश पारित केलेला आहे. तसेच या आदेशामध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार दर शनिवारी जनता कर्फ्यू राहील असे आदेशित केलेले आहे.
        परंतु दि. 22ऑगस्ट-2020 पासून श्रीगणेशोत्सवास सुरुवात होत असून दि. 22 ऑगस्ट-2020 रोजी शनिवार असल्याने यादिवशी नागरिकांना श्रीगणेशमूर्ती व इतर अनुषंगिक साहित्याची खरेदी करता यावी. यासाठी जनता कर्फ्यूमध्ये शिथिलता देणे आवश्यक आहे.
         तरी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये नागरिकांना गणेशोत्सवाचे कालावधीत श्रीगणेशमूर्ती व अनुषंगिक इतर साहित्याची खरेदी करता यावी. याकरिता दि. 22ऑगस्ट-2020 व दि. 29ऑगस्ट-2020 रोजीच्या जनता कर्फ्यूमध्ये  खालील नमूद बाबींकरिता शिथिलता देत असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी कळविले आहे. 
1. दि. 22 ऑगस्ट-2020 व दि.29ऑगस्ट-2020 रोजीचे जनता कर्फ्यू दिवशी श्रीगणेशमूर्तीची व श्रीगणेशोत्सवाकरिता लागणा-या साहित्याची विक्री करणारी दुकाने चालू ठेवण्यास परवानगी राहील.
2. वरिल नमूद दुकानांव्यतिरिक्त अन्य दुकाने व बाजारपेठ तसेच आस्थापना यांचेकरिता दि. 22ऑगस्ट-2020 व दि. 29 ऑगस्ट-2020 रोजीचा जनता  कर्फ्यू पूर्वीप्रमाणेच लागू राहील.
         सदरील आदेशाची कडक अंमलबजावणी सर्व संबंधित यंत्रणांनी करावी. कुठल्याही व्यक्तीकडुन या आदेशातील सुचनांचे उल्लंघन झाल्यास त्यांचेविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम 51 ते 60 व भारतीय दंड संहिता कलम 188 नुसार कायदेशीर कारवाईस पात्र राहील. तसेच अन्य कायदेशीर कारवाई देखील केली जाईल.
असे आदेशात नमुद करण्यात आले आहे .

 
Top