प्रा.राजा जगताप यांना विविध राज्यातील १३१ संस्था,फौंडेशन यांनी "कोरोना योध्दा" पुरस्काराने केले सन्मानित
उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)
उस्मानाबाद येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील, मराठी विषयाचे व टाकळी (बें) ता.उस्मानाबाद येथील, प्रा.राजा निवृत्ती जगताप यांनी कोरोना संकट काळात, लाॅकडाऊनच्या परिस्थितीत, कोरोना विषयावरील विविध प्रश्नावर, मजुर व परप्रांतीय विद्यार्थ्यांच्या समस्यावर,प्रत्येक्ष क्वारंटाईन सेंटरवर जावून समस्या मांडल्या होत्या.तसेच सामाजिक दातृत्ववान माणसांच्या कार्यावर, कोरोणाला न घाबरता प्रत्येक्ष ठिकाणावर जावून मार्च ते जून या चार महिन्याच्या कालावधित सातत्याने व नियमितपणे विविध दैनिकातून लेखण केले होते. व कांही गरजु विद्यार्थ्यांना मदत ही केली होती.त्यांनी "कोरोना "या विषयावर केलेल्या लेखणाची दखल राज्यातील व परराज्यातील विविध नामांकित संस्था, फौंडेशन,पञकार संघ , प्रेस असोसिएशन, फिल्म कलाकार संघ, विविध राज्यातील मानवाधिकार संघटना यांनी घेवून प्रा.राजा जगताप यांना १३१ महाराष्ट्र राज्य व परराज्यातील विविध संस्थांनी "कोरोना योध्दा" पुरस्काराने गौरविले आहे. महाराष्ट्र राज्यातील त्यांना ६१ पुरस्कार मिळाले आहेत.तर दिल्ली येथील समस्त जोगी महासभा,अखिल भारतीय तेली महासभा,श्रीमती सोनिया गांधी ब्रिगेड आॅल इंडिया काँग्रेस,मानव अधिकार एवं अपराध नियंञण संघटन ट्रस्ट, भारतीय नागरिक संस्था,मानवाधिकार सुरक्षा संघ, मानवाधिकार संरक्षण समिती यांचे सन्मान मिळाले आहेत. दिल्ली येथील २२ संस्थांनी त्यांना सन्मानित केले आहे. तसेच उत्तरप्रदेश येथील इंडियन प्रेस असोसिएशन,भारतीय महिला अत्याचार विरोधी मोर्चा, आग्रा, राषट्रीय मानव अधिकार एवं भ्रष्टाचार निवारण भारत, बुलंदशहर, आंतरराषट्रीय मानवाधिकार संरक्षण अॅण्ड एंटी क्रप्शन ब्युरो, इंडिया, रियल मीडिया फौंडेशन उत्तरप्रदेशातील त्यांना १५ पुरस्कार प्राप्त झाले आहेत. आंध्रप्रदेश येथील योगा असोसिएशन चित्तोर,मना स्वच्छंद सेवा समस्थ,असे ५पुरस्कार प्राप्त झाले आहेत,हरियाणातील तायकांदो स्पोर्टस असोसिएशन दादरी हरियाणा,जी.एक्सप्रेश न्युज यांनीही त्यांना कोरोना योध्दा पुरस्कार देवून गौरविले आहे. तेलंगणा राज्यातील सरी सुधा सेवा समिती वरंगल,भारतीय मानव कल्याण महासमिती, उथ्थवयुम उरऊगल अरक्कअटालाई मधुराई,असे ४ पुरस्कार प्राप्त झाले आहेत. गुजरातमधील अभिव्यक्ती न्युज अहमदाबाद, बिहारमधील संजना फौंडेशन, प्रगती फौंडेशन,पंजाबमधील पंजाब प्रदेश काँंग्रेस सेवा दल,हिमाचलप्रदेश मधील अमित सिंगल सोशल वेल्फियर सोसायटी यांनी त्यांचा "कोरोना योध्दा"पुरस्कार देवून गौरव केला आहे.राज्यस्थान ६,मध्यप्रदेश 2, कर्नाटक 2, तामिळनाडू येथील ४ संस्थांचे पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. प्रा.राजा जगताप यांच्या "कोरोना" विषयाच्या सामाजिक लेखणाला महाराष्ट्र राज्यातील ६१ तर विविध राज्यातील सामाजिक संस्था, फौंडेशन व प्रेस असोसिएशन, न्युज चॅनल, ७० पुरस्कार प्राप्त झाले आहेत"कोरोना यौध्दा"म्हणून त्यांना सबंध देशातील राज्यातून आजपयर्यंत १३१ पुरस्कार पुरस्कार प्राप्त झाले आहेत. महाराष्ट्र राज्यासह ,विविध राज्यातील पुरस्कार मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले असून वरील संस्थांचे आभार मानले आहेत.