Views


*ऑनलाईन शिक्षण पद्धती बंद करण्यासाठी मा. मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र यांना उपविभागीय अधिकारी कळंब यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले*

कळंब:-(प्रतिनिधी)
    
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्यात
मार्च महिन्यापासून लाॅकडाऊन कालावधीत कमी जास्त प्रमाणात बंद चालू होत असून व कोरोना संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शैक्षणिक संस्था बंद आहेत त्यामुळे सर्व शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण हि संकल्पना राबवून ऑनलाईन शिक्षण देण्याचा घाट घातला आहे परंतु सर्व सामान्य माणसाचा शेतकरी शेतमजूर कष्टकरी यांच्या कडे ऍनराॅईड मोबाईल उपलब्ध नसल्याने शिक्षण घेणे दुरापास्त झाले असून त्यांच्यावर  शैक्षणिक अन्याय होत आहे असे निर्देशनास येत आहे त्यामुळे गरिब मोलमजुरी करून पोट भरणारे शेतमजूर यांच्या मुलांना शिक्षण घेणे अवघड झाले असल्यामुळे मा मुख्यमंत्री साहेब यांना विनंती आहे की आपण याचा सारासार विचार करून ऑनलाईन शिक्षण हि संकल्पना बंद करण्यात यावी किंवा ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेता येत नाही अशा मुलांना शाळेमार्फत सर्वे करुन ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी मोबाईल ची व्यवस्था करावी जेणेकरून विद्यार्थी कोणताही असो तो  शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी  जर आपण मोबाईल ची व्यवस्था केली नाही तर ऑनलाईन शिक्षण बंद करण्यात यावे अन्यथा रिपब्लिकन सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालया समोर तीव्र आंदोलन करण्यात येईल व महाराष्ट्र शासनाच्या आमदार मंत्री पालकमंत्री यांना घेराव घालण्यात येईल व काळे झेंडे दाखवून निषेध आंदोलन करण्यात येईल  अनिल हजारे रिपब्लिकन सेना उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष लाखन गायकवाड रिपब्लिकन सेना तालुका प्रमुख सूरज वाघमारे आप्पासाहेब हजारे सायस हजारे यांनी निवेदनाद्वारे कळविले आहे

 
Top