Views


छत्रपती कामगार संघटना मराठवाडा विभागाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी 

लोहारा:-(इकबाल मुल्ला)
छत्रपती कामगार संघटना मराठवाडा  विभागाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. भारताची आर्थिक राजधानी मुंबई हे महाराष्ट्राला मिळवून देण्यासाठी अण्णाभाऊ साठे यांचा सिंहाचा वाटा होता. रक्ताच्या नात्यापेक्षा विचाराचे नाते श्रेष्ठ म्हणून, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एक नंबर वारस अण्णाभाऊ होते. म्हणून जग बदल घालूनी घाव मज सांगून गेले भीमराव. याचा अर्थ बाबासाहेबांनी अण्णाभाऊंना वैचारिक वारस करून कानमंत्र दिलेला आहे. कामगारासाठी विविध प्रकारचे अण्णा भाऊंनी आंदोलन केले. म्हणून भारतरत्न अण्णाभाऊ साठे यांना मिळावा. व आरक्षणाचे जनक, लोकराजा, छत्रपती शाहू महाराज तसेच, बहुजनांना शिक्षणाची दारे खुली करणारे, महात्मा ज्योतिबा यांनाही भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी संघटनेच्यावतीने व सर्व बहुजनांच्या वतीने ठराव पास करण्यात आला. या सर्व महापुरुषांना भारतरत्न पुरस्कार मिळावा असे यावेळी मार्गदर्शन करताना छत्रपती कामगार संघटनेचे अध्यक्ष तानाजी गायकवाड यांनी केले. तसेच बहुजन समाज पार्टीचे उमरगा विधानसभा प्रभारी राजेंद्र गायकवाड, ग्रामीण समाज सुधारक मंडळाचे अध्यक्ष अभय कुलकर्णी, यांनी विचार व्यक्त केले. यावेळी संघटनेचे उस्मानाबाद जिल्हाउपाध्यक्ष म्हणून उमाकांत लांडगे व जिल्हा सचिव म्हणून शिवानंद राठोड यांची निवड करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे सचिव तिमा माने यांनी केले तर उपाध्यक्ष बालाजी माटे यांनी आभार मानले. या कार्य कार्यक्रमास तालुका अद्यक्ष दयानंद  राठोड, राम यादव, दत्ता शेवाळे, दीपक तावडे, आदी कार्यकर्ते उपस्तित होते.

 
Top