Views
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण व वृक्षारोपण  


लोहारा:-(इकबाल मुल्ला)               
मुरूम येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालय व प्रतिभा निकेतन कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने ७४ वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी ध्वजारोहण नगर शिक्षण विकास मंडळाचे सचिव व्यंकटराव जाधव यांच्या हस्ते संपन्न झाला. प्रारंभी कै.माधवराव (काका) पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मान्यवरांच्चा हस्ते पुष्पअर्पण करुन अभिवादन करण्यात आले. या दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयातील परिसरात वृक्षारोपण व्यंकटराव जाधव, माजी नगराध्यक्ष धनराज मंगरुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपप्राचार्य डॉ.चंद्रकांत बिराजदार, उपप्राचार्य सुधीर अंबर, प्रा.डॉ.महेश मोटे, डॉ.विलास खडके, डॉ.राम बजगिरे, काकासाहेब पाटील, प्रा.राजकुमार वाकडे, प्रा.राजेश दलाल, सच्चीदानंद अंबर आदिंनीची उपस्थिती होती. फिजीकल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करून डॉ.भिलसिंग जाधव, डॉ.सुधीर पंचगल्ले,प्रा.नारायण सोलंकर, डॉ.नागनाथ बनसोडे, भालचंद्र टाचले, प्रभाकर महिंद्रकर, इसाली चाऊस, श्रावण कोकणे, आदिंनी पुढाकार घेतला.


 
Top