Views


श्री सिद्धीविनायक मल्टीस्टेट को ऑप क्रे सोसायटी लि.उस्मानाबाद च्या मुख्य कार्यालयात ७४ वा स्वातंत्रदिन साजरा


लोहारा:-(इकबाल मुल्ला)
 श्री सिद्धीविनायक मल्टीस्टेट को ऑप क्रे सोसायटी लि.उस्मानाबाद च्या मुख्य कार्यालयात ७४ वा स्वातंत्रदिनाचा कार्यक्रम सकाळी ०८.३० वा संपन्न झाला. या प्रसंगी ध्वजारोहण व भारतमाता प्रतिमापूजन श्री सिद्धीविनायक मल्टीस्टेट को ऑप क्रे सोसायटी लि.चे सिद्धीविनायक अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊन राष्ट्रगीत गायनाने स्वातंत्रदिन साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश कामटे, कौस्तुभ दिंडोरे, अरविंद गोरे तसेच संस्थेचे मर्माचारी वृंद उपस्थित होते.

 
Top