Views


खुल्या आंतरराष्ट्रीय व्हच्युअल पंचाक सिलात स्पर्धेत महाराष्ट्राच्या स्वयंम संदीप पाटील यांनी ब्राॅझ पदक मिळविले 


लोहारा :-(इकबाल मुल्ला)
 इंडोनेशिया येथे झालेल्या खुल्या आंतरराष्ट्रीय व्हच्युअल पंचाक सिलात स्पर्धेत महाराष्ट्राच्या स्वयंम संदीप पाटील याने उत्कृष्ट कामगिरी केली. स्पर्धेमध्ये 4 हजार खेळाडू सहभागी होते. या स्पर्धेत अमेरिका, मलेशिया, सिंगापूर, अफगाणिस्तान, थायलंड, भारत, या देशातील खेळाडु सहभागी झाले होते. हि स्पर्धा दि. 8 ते 17 आॅगस्ट दरम्यान पार पडली. या स्पर्धेत स्वयंम याने भारतीय संघासाठी दोन ब्राॅझ पदकांची कमाई केली. यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

 
Top