Views


बेंडकाळ येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा अंतर्गत शेतीशाळा संपन्न


लोहारा:-(इकबाल मुल्ला)
लोहारा तालुक्यातील बेंडकाळ येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा अंतर्गत सोयाबीन, तूर व इतर या पिकांचे कीड व इतर रोगापासून संरक्षण कसे करायचे ? याविषयी शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या शेतीशाळेत कीटकनाशके फवारणी करतेवेळी घ्यावयाची काळजी, सोयाबीन व मुग कीड रोग व्यवस्थापन या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच हाराळी येथील ज्ञानप्रबोधिनी येथे शेतमजुरांचे कौशल्य आधारित प्रशिक्षण घेण्यात आले. यामध्ये कीटकनाशके सुरक्षित फवारणी आणि हाताळणी या विषयावर उपस्थित मान्यवरांकडून मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश घाटगे, तुळजापूर येथील कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ श्रीकृष्ण झगडे, उपविभागीय कृषी अधिकारी बी.बी.कोळेकर, कृषी उपसंचालक एस.पी. जाधव, लोहारा तालुका कृषी अधिकारी एम.बी बिडबाग, उस्मानाबाद कृषी अधिकारी सचिन पांचाळ, मंडळ कृषी अधिकारी जे.डी. माळी व गौरीताई कापरे  आदी उपस्थित होते.  या कार्यक्रमास अनंत गोरे, प्रवीण गोरे, विष्णू गोरे, प्रमोद गोरे,  ज्ञानेश्वर गोरे व दिलीप कदम यांच्यासह इतर शेतकरी वशेतमजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शेतीशाळा तज्ञ अजिंक्य पाटील  यांनी सुरक्षा किट घालून फवारणी करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना अल्पोपहार व चहापाणी करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे आभार कृषी सहाय्यक शैलेश जट्टे यांनी मानले
 
Top