Views


आ.सुजितसिंह ठाकूर यांच्या कुटुंबातील सहा जण कोरोनामुक्तलोहारा :-(इकबाल मुल्ला)
भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या कुटुंबातील सहा जणांनी कोरोनावर मात केली आहे. कुटुंबातील कोरोनाची बाधा झालेल्या एकूण 11 पैकी आईसह 6 सदस्य आता कोरोनामुक्त झाले आहेत. वडील, मी, माझी सौभाग्यवती शैला व भाऊ सुबोधसिंह 14 ऑगस्टपासून डाॅ. सोमाणी यांच्या मार्गदर्शनात उपचारासाठी नर्गीस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पीटल, बार्शी येथील कोविड सेंटरमध्ये दाखल आहोत. सर्वांची प्रकृती चांगली असल्याची माहिती आमदार ठाकूर यांनी दिली.आमदार ठाकूर यांच्या मातोश्री पद्मादेवी मानसिंह ठाकूर ( वय 75 ) या कोरोना विषाणुवर यशस्वी मात करून घरी परतल्या आहेत. बार्शी येथील सोमाणी हाॅस्पीटलचे डाॅ. सोमाणी व स्टाफ आणि परंडा येथील योगीराज हाॅस्पीटलचे प्रमुख व उपजिल्हा रूग्णालयाचे वैदयकीय अधिक्षक डाॅ. देवदत्त कुलकर्णी व स्टाफ यांचे आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी आभार मानले आहेत.

 
Top