Views




*माझा प्रभाग माझे कुंटुंब..* हेच माझे कर्तव्य नगरसेविका सौ. सरला अजय सरवदे 


कळंब :परवेज मुल्ला


शहरातील प्रत्येक प्रभागात कोरोना पाॕझिटिव्ह पेशंट आढळले पण मॕडम तुम्ही  वेळोवेळी घेतलेल्या प्रभागाच्या काळजी मुळे आपल्या प्रभागात एकही पेशंट निघाला नाही मॕडम तुमचे अभिनंदन असे वारंवारं प्रभागातील लोकांचे फोन व प्रत्यक्ष भेटुन अभिनंदन करतात म्हणुन  हा शब्द प्रपंच.,,,,,, व कर्तव्य हेच ध्येय समोर ठेवून प्रभाग क्रं.6 मधील जनतेची कुंटुंबातील सदस्याप्रमाणे काळजी घेऊन कोरोना संदर्भात वेळीच उपाय योजना करत असलेल्या म्हणजे नगरसेविका सौ. सरला अजय सरवदे. 
         राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडणूक लढवून जिंकून आल्यावर नागरिकांच्या गैरसोयी, समस्या हा सातत्याने पाठपुरावा करून सोडविण्यासाठी धडपडत प्रयत्न केला.
 संपुर्ण जगात व देशात कोराना सारख्या महामारीच्या काळात जेव्हा संपूर्ण देश लाॅकडावून होता विविध ठिकाणी हा रोग पसरत असताना आपण या समाजाचे काही देणे लागतो या उद्देशाने स्वतः ची की परिवाराची तमा न बाळगता स्वत:ने गल्लोगल्लीत जावून  थर्मामिटर ने डोअर टु डोअर अबाल वृद्धाची तपासणी वारंवार केली.सर्दी, खोकला,ताप अशी लक्षणे असणार्यांना तात्काळ सरकारी रुग्नालयात तपासणी करण्यास प्रवृत्त केले. प्रभागात चार वेळेस फवारणी करुन प्रभाग निर्जंतुक करण्यात आला.प्रभागात वैयक्तिक संपर्क ठेऊन सगळ्यांची विचार केली. प्रभागात कोणी बाहेर गावाहुन आलेले असेल तर तात्काळ ग्रामिण रुग्णालय,पोलीस स्टेशन यांना सांगुन त्यांची तपासणी केली.
कोरोना पाॕझीटीव्ह पेशंटच्या संपर्कात प्रभागातील कोणी व्यक्ती आली असेल तर त्यांची तपासणी करुन त्यांना अलगीकरणात ठेवले.कोरोना संदर्भात वेळोवेळी जनजागृती प्रभागात केली. कोरोना आजार हा आपल्या दररोजच्या जगण्याचा एक भाग असुन घाबरुन न जाता शासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करण्यास प्रवृत्त केले.राशन वाटपाच्या वेळेस physical distance maintain करणे.डोअर टु डोअर सॕनीटायझर वाटप केले.  
अर्सेनिक अल्बम 30 या गोळ्यांचे वाटप केले. या आदी कामे केल्याने त्यांचे फोन द्वारे, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भेटून अभिनंदन करुन पुढील कार्यास शुभेच्छा देत आहेत. 


अनेक बाबी मुळे प्रभाग क्रं.6 मध्ये अद्याप एक ही पेशंट कोरोना पाॕझीटिव्ह निघाला नाही.प्रभागातील बर्‍याच लोकांचे कौतुकापर फोन येतात.या प्रभागाची मी नगरसेविका आहे याचा मला अभिमान वाटत असून प्रामाणिकपणे नगरसेवक या पदाला न्याय दिला..या भयानक महामारीचा शिरकाव माझ्या प्रभागात होऊ न देण्यासाठी प्रामाणीक काम केले यामुळे प्रभागातील जनतेने ही भरपूर सहकार्य केले.,वेळोवेळी सांगीतलेल्या सुचना ऐकल्या. भविष्यात असेच सहकार्य करावे हिच अपेक्षा वलवकरच कोरोना मुक्त होऊया.. 
मला फोन करुन प्रत्यक्ष भेट घेऊन माझ्या कामाचे कौतुक करणार्या सर्वांची मि आभारी आहे हे माझे कर्तव्य आहे मी फक्त प्रामाणीक माझे कर्तव्य केले.

   सौ.सरला अजय सरवदे
          नगरसेविका
     नगर परिषद कळंब


 
Top