माहिती आधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या अक्कलकोट तालुकाध्यक्षपदी किरण किरात यांची निवड
लोहारा:-( इकबाल मुल्ला)
केंद्रीय निवडणूक आयोग मान्यता प्राप्त नॅशनल स्पेशालिस्ट पार्टी संलग्न असलेल्या माहिती आधिकार व पत्रकार संरक्षण समिती किरण किरात यांची अक्कलकोट तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. हि निवड माहिती आधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री मा अभिजित आपटे राष्ट्रीय महासचिव गोविंद भावे समस्त विभाग आघाड्यांचे मार्गदर्शक मा अमृताताई भंडारी व मा प्रकाश भारती यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेशाध्यक्ष मा दिलीप कांबळे यांच्या संमतीने महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख कमलेश शेवाळे व पश्चिम महाराष्ट्र विभाग अध्यक्ष अमर बेंद्रे यांनी महाराष्ट्र प्रदेश सचिव सौ नमिता थिटे. उमेश काशीकर पश्चिम महाराष्ट्र सचिव गणेश बापु भोसले सोलापूर जिल्हाध्यक्ष यांनी निवडीसंबंधिचे पत्र दिले. या वेळी पश्चिम महाराष्ट्र विभाग अध्यक्ष अमर बेंद्रे सौ.संध्या काळे सौ सुनीता देशपांडे सोलापूर महिला शहराध्यक्षा प्रणोती जाधव उपशहराध्यक्ष अनुजा कस्तुरे सौ.संध्या काळे सौ. श्र्वेता व्हनमाने प्रा.रोहीणी कुलकर्णी सौ.आरती काशीकर सौ सारीका कुलकर्णी अतुल मोरे धनराज जानकर दिपक माळी रविराज बनसोडे, आदींनी अभिनंदन केले. या वेळी किरण किरात यांनी सांगितले की, सर्व समाजातील तळागाळातील लोकांना माहिती आधिकार व पत्रकार संरक्षण समिती मध्ये सामावून घेवुन समाजाच्या विविध प्रकारच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले.