Views


संत सेना महाराज पुण्यतिथी साधेपणाने साजरी करण्यात आली.

कळंब :-(प्रतिनिधी)
संत सेना महाराज पुण्यतिथी साधेपणाने साजरी करण्यात आली. प्रतिवर्षाप्रमाणे नाभिक समाजाचे आराध्य दैवत श्री संत सेना महाराज पुण्यतिथी सोहळा जल्लोषात साजरा करण्यात येतो मात्र, यंदा कोरोना या महामारीने जगभरात थैमान घातले आहे, त्यामुळे विविध सण उत्सव अगदी साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत,  त्यामुळे संत सेना महाराज पुण्यतिथी ही महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने संत सेना महाराज  मंदिर सभागृहात ता 16, रविवारी  अगदी साधेपणाने साजरी करण्यात आली. श्री भारत राऊत यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली, दुपारी बारा वाजता संत सेना महाराज यांच्या प्रतिमेवर गुलाल, फुलांची उधळण करण्यात आली.    
श्री भारत राऊत यांच्या वतीने महाप्रसाद वाटप करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हा संघटक  प्रेमचंद गोरे, जिल्हा उपाध्यक्ष कल्याण मंडाळे, तालुका प्रमुख बापुराव सुरवसे, उपाध्यक्ष सचिन मंडाळे, युवक तालुका प्रमुख राजे सावंत, शहर अध्यक्ष युवराज पंडित, संत सेना महाराज टृस्ट अध्यक्ष विष्णू मंडाळे, गोविंद रणदिवे, ओंकार मंडाळे,   श्रीकृष्ण अंबुरे, ज्ञानेश्वर पंडित, रणजित शेंद्रे, महेश काळे, गोकुळ मंडाळे, अशोक मंडाळे, बालाजी मंडाळे,  हरी मंडळ, मुन्ना काळे,  प्रमोद करवलकर, नाना करवलकर, व समाज बांधव उपस्थित होते.


 
Top