राष्ट्रीय मानवधिकार भ्रष्टाचार विरोधी संघटनेच्या उस्मानाबाद जिल्हा अध्यक्षपदी अनंत घोगरे
कळंब :-(प्रतिनिधी)
राष्ट्रीय मानवधिकार भ्रष्टाचार विरोधी संघटनेच्या उस्मानाबाद जिल्हा अध्यक्षपदी तरुण तडफदार युवा नेते अनंत घोगरे यांची उस्मानाबाद जिल्हा अध्यक्षपदी नुकतीच निवड झाली आहे .
अधिक वृत्त असे की कळंब तालुक्यातील गोविंदपूर येथील युवा नेते सतत विविध प्रश्नावर जिल्हास्तरावर नागरिकांच्या न्याय हक्कासाठी प्रयत्न करुन सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे युवा नेते अनंत घोगरे यांची राष्ट्रीय मानवाधिकार भ्रष्टाचार विरोधी संघटनेच्या उस्मानाबाद जिल्हा अध्यक्षपदी संघटनेचे राष्ट्रीय अक्ष्यक्ष गजानन भाऊ चिंचवडे यांनि नुकतीच निवड केली असून घोगरे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. घोगरे यांच्या निवडी बद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे .