Views




दुध दरवाढीसाठी नारंगवाडी येथे भाजपचा रास्ता रोको आंदोलन

 
लोहारा:-(इकबाल मुल्ला)
उमरगा तालुका भाजपाच्या वतीने दूध उत्पादकांच्या मागण्यांसाठी राज्य शासनाच्या विरोधात भाजप प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकूर, आ.राणाजगजितसिंह पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे, बुध्दीजीवी प्रकोष्ठ प्रदेश संयोजक तथा माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली भाजप तालुकाध्यक्ष कैलास शिंदे यांनी उमरगा तालुक्यातील नारंगवाडी येथे रास्तारोको  आंदोलन करुन विविध मागण्यांचे निवेदन नारंगवाडी मंडळाचे मंडळ अधिकारी पी.जी.कोकणे, तलाठी एस.एस.  गिरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक मालसुरे यांना दिले.
 राज्यात अडचणीत सापडत असलेल्या शेतकरी दुधाला कमी भाव मिळत आहे, म्हणून आर्थिक अडचणीत सापडला आहे. राज्य सरकारने तात्काळ गाईच्या दुधाला १० रुपये, म्हशीच्या दुधाला ३० रुपये आणि दुधाच्या भूकटीला ५० रुपये अनुदान शेतकऱ्याच्या  खात्यावर उपलब्ध करून द्यावे, सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे व्यापारी वर्ग रासायनिक औषधाची आणि खताची काळाबाजारी करत आहेत. त्यांच्यावर तात्काळ कार्यवाही करून पुरवठा व्यवस्थित करावा, अशी मागणी निवेदनात केली आहे. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष कैलास शिंदे, माजी तालुकाध्यक्ष माधव पवार, रमेश माने, दिलीपसिंह गौतम, सिद्धेश्वर माने, लिंबराज सोमवंशी, प्रदीप सांगवे, दयानंद पवार, भागवत पाटील, राम लवटे, धर्मराज सोनवणे, विठ्ठल चिकुंद्रे, धोंडीराम बिराजदार, किसन पाटील, अनिल बिराजदार, किसन त्रिकोळे, भरत पवार चेतन पवार, यांच्यासह भाजपा कार्यकर्ते  उपस्थित होते.

 
Top