Views
महायुती व लोहारा तालुका भाजपाच्या वतीने दूध उत्पादकांच्या मागण्यांसाठी राज्य शासनाच्या विरोधात रास्तारोको व दुध संकलन करुन गरीब नागरीकांना वाटप करुन आंदोलन 

लोहारा:-( इकबाल मुल्ला)
महायुती व लोहारा तालुका भाजपाच्या वतीने दूध उत्पादकांच्या मागण्यांसाठी राज्य शासनाच्या विरोधात भाजप प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकूर, आ.राणाजगजितसिंह पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे, बुध्दीजीवी प्रकोष्ठ प्रदेश संयोजक तथा माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली भाजप तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी लोहारा तालुक्यातील आष्टामोड येथे रास्तारोको व शहरातील शिवाजी चौक येथे दुध संकलन करुन दुध रस्त्यावर न ओतता ते गरीबांना वाटप करुन आंदोलन करण्यात आले.लॉकडाऊन मध्ये मागणी कमी झाल्याने दूध उत्पादक मोठ्या संकटात सापडला आहे. हॉटेल व अन्य व्यावसायिकांकडून खरेदी थांबल्याने दुधाचे भाव 16, 17  रु. पर्यंत घसरल्याने उत्पादन खर्चही वसूल होत नाही, अशी स्थिती आहे. राज्य सरकारने 25 रु. लिटर प्रमाणे दूध खरेदी करण्याची घोषणा केली होती. मात्र ठराविक दूध संघांकडूनच शासनाची दूध खरेदी केली जात आहे. परिणामी राज्यभरातील अन्य दूध उत्पादकांवर अन्याय होत आहे. अशा स्थितीत दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर 10  रू. अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात यावे, दूध भुकटीच्या निर्यातीसाठी प्रति किलो 50  रू. अनुदान द्यावे तसेच गाईच्या दुधाला 30 रू. दर द्यावा, अशा, विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. 
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, भाजपा माजी तालुकाध्यक्ष विक्रांत संगशेट्टी, तालुका सरचिटणीस नेताजी शिंदे, मिडिया तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, रिपाई तालुकाध्यक्ष दिगंबर कांबळे, रासप तालुकाध्यक्ष देवकर, शिवशंकर हत्तरगे, ओबीसी माेर्चा  तालुकाध्यक्ष दगडू तिगाडे, प्रमोद पोतदार, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष बालाजी चव्हाण, बालासिंग बायस, मल्लिनाथ फावडे,संतोष फरीदाबादकर, काशिनाथ घोडके, शिवाजी दंडगुले, संतोष कुंभार, बालजी साेनटक्के, आदी, कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top