Views


एफएल- III अनुज्ञप्त्यांना नवीन मद्यसाठा घेण्यास व लॉकडाऊन कालावधी संपेपर्यंत सिलबंद मद्यविक्री करण्यास अटी व शर्तीच्या अधीन राहून परवानगी



 उस्मानाबाद:-(प्रतिनिधी)
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायोजनेचा भाग म्हणून एका ठिकाणी होणारी नागरिकांची गर्दी व त्यामुळे होणारा संसर्ग टाळण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील एफएल-II, एफएलबीआर- II, सीएल- III व एफएल- III या किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्त्यांना सिलबंद बाटलीतून मद्यविक्रीची परवानगी देण्यात आलेली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दि. 9 जुलै, 2020 च्या अधिसुचनेनुसार नमुना एफएल- III अनुज्ञप्त्यांना नवीन मद्यसाठा घेण्यास व लॉकडाऊन कालावधी संपेपर्यंत त्यांना सिलबंद मद्यविक्री करण्यास परवानगी दिलेली आहे. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी त्यांना प्रदान करण्यात आलेल्या आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या अधिकाराचा वापर करुन यापूर्वी देण्यात आलेल्या आदेशातील इतर अटी व शर्ती कायम ठेऊन जिल्ह्यातील नमुना एफएल- III अनुज्ञप्त्यांना नवीन मद्यसाठा घेण्यास व लॉकडाऊन कालावधी संपेपर्यंत सिलबंद मद्यविक्री करण्यास परवानगी दिली आहे.

 
Top