Views

वारकरी सांप्रदाय मंडळाच्या जिल्हाध्यक्षपदी महादेव सस्ते यांची निवड
उस्मानाबाद:-( प्रतिनिधी)
अखिल भाविक वारकरी सांप्रदाय मंडळच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्षपदी येडशी येथील महादेव सस्ते यांची निवड दि. 10 जुलै रोजी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकर महाराज इंगळे यानी केली. कलाक्षेत्रातील तसेच वारकरी सांप्रदयातिल  परंपरागत या घराण्याचे  योगदान लक्षात घेत महादेव जालिंदर सस्ते उर्फ गुरूजी यांची वारकर्‍यांसाठी तसेच कलाकारांसाठी उपयुक्त ठरेल या दृष्टीकोणातून ही नियुक्ती करण्यात आल्याचे वारकरी मंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे. धाराशिव जिल्ह्यातील वारकरी सांप्रदायामध्ये योगदान देणार्‍या वर्गाच्या हिताचे निर्णय घेण्याचे सर्व अधिकार राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकर महाराज इंगळे यानी दिले आहेत. अखिल भाविक वारकरी सांप्रदाय मंडळ हे संपूर्ण भारतभर कार्य करणारे मंडळ असून ते निश्चित देह व उदिष्टे घेऊन कार्य करत आहे. या मंडळाच्या माध्यमातून वारकरी संप्रदयातील वारकर्‍यानचे प्रश्न मिटवणे व त्याच्या वैयक्तिक लाभाचे प्रश्न योग्य दिशा धरुन मिटवले जातील असे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष महादेव सस्ते यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविण्यात आले आहे. या निवडीबद्दल वारकरी मंडळाचे प्रदेश अध्यक्ष चैतन्य महाराज निबोळे व सदस्य जोतिराम महाराज चांगभले यांच्यासह सर्व मित्रपरिवारांतून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

 
Top